केविआर कंपनीने सिनाळा गावातील प्रकल्पग्रस्ताना रोजगार न दिल्यास मनसेचे खळखट्याक.
मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचा पत्रकार परिषद घेऊन वेकोली प्रशासनासह केवीआर कंपनीला इशारा.

चंद्रपूर :- AMC24 News 📰 🗞️
वेकोली चंद्रपूर क्षेत्रातील सिनाळा, मसाळा व नवेगाव या गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी व घरे वेकोली द्वारे अधिग्रहित करून या गावांचे पुनर्वसन करण्यात आले, मात्र प्रकल्पग्रस्त असणाऱ्या या तिन्ही गावातील तरुण बेरोजगार यांना या कंपनी मध्ये नोकऱ्या किंव्हा रोजगार दिला नाही, पर्यायाने या प्रकल्पग्रस्तांची एक प्रकारे फसवणूक करण्यात आली, दरम्यान स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात वेकोली प्रशासन व कंपनी व्यवस्थापन यांना निवेदन देऊन पत्रकार परिषद मध्ये इशारा देण्यात आला की येत्या 15 दिवसात जर या तिन्ही गावातील प्रकल्पग्रस्तांना रोजगार दिला नाही तर मनसे तर्फे खळखट्याक आंदोलन करण्यात येईल, यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे, राज वर्मा इत्यादीची उपस्थिती होती.

चंद्रपूर तालुक्यातील सिनाळा, मसाळा व नवेगाव यागावाची जमीन येथील कोळसा खाण प्रकल्पासाठी घेण्यात येऊन इथे केविआर या कंपनीमार्फत कोळसा खाणी करीता उत्खनन सुरु आहे, या प्रकल्पासाठी ज्या अर्थी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी आपली जमीन व उपजीविका

गमावली असून त्यांचे पुनर्वसन तर करण्यात आले मात्र, पुनर्वसनानंतरही प्रकल्पग्रस्त कुटुंबातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला नाही, ही अत्यंत गंभीर व अन्यायकारक बाब आहे. दरम्यान सदर प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारांना रोजगार दिला जात असताना, स्थानिक सुशिक्षित व बेरोजगार युवकांना संधी नाकारली जात आहे. यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. प्रकल्प उभारणीवेळी स्थानिकांना रोजगार देण्याचे दिलेले आश्वासन कंपनीने पाळले नाही त्यामुळे मनसे कामगार सेनेच्या माध्यमातून येत्या 15 दिवसात तिन्ही गावातील प्रकल्पग्रस्तांना घेऊन मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल व या आंदोलनादरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडल्यास त्यासाठी स्वतः वेकोली प्रशासन व केवीआर कंपनी व्यवस्थापन जबाबदार असेल असा इशारा मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी प्रशासनाला दिला आहे.

AMC24 News 📰 🗞️
मुख्य संपादक
अरविंद चाहादे घुग्घुस
9405714165



