Sunday, June 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedबांधकाम कामगारांसाठी विविध योजना; सर्व सेवा पूर्णपणे मोफत अनधिकृत एजंटांकडून फसवणुकीपासून सावध...

बांधकाम कामगारांसाठी विविध योजना; सर्व सेवा पूर्णपणे मोफत अनधिकृत एजंटांकडून फसवणुकीपासून सावध राहा – प्रशासनाचे आवाहन

बांधकाम कामगारांसाठी विविध योजना; सर्व सेवा पूर्णपणे मोफत
अनधिकृत एजंटांकडून फसवणुकीपासून सावध राहा – प्रशासनाचे आवाहन

AMC24 News 📰 🗞️

नांदेड, दि. 3 एप्रिल : महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांची नोंदणी, नोंदणीचे नूतनीकरण तसेच विविध योजनांसाठी अर्ज प्रक्रिया MAHABOCW.IN या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यात येते. या संकेतस्थळावरील सर्व सेवा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहेत.

दरम्यान, काही मध्यस्थ, एजंट किंवा दलाल कामगारांकडून अर्ज भरून देण्याच्या नावाखाली अनधिकृत शुल्क आकारत असल्याचे तसेच लाभाच्या रकमेपैकी टक्केवारी घेत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. ही बाब कामगारांची फसवणूक व आर्थिक शोषण करणारी असून गंभीर स्वरूपाची आहे.

कामगारांसाठी महत्त्वाच्या सूचना

MAHABOCW पोर्टलवरील सर्व सेवा पूर्णपणे मोफत आहेत.

कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थाला पैसे देऊ नयेत.

अर्ज स्वतः किंवा अधिकृत सेवा केंद्र (CSC / सेतू केंद्र) मार्फतच करावा.

लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये.

अशा व्यक्तींची माहिती तात्काळ कामगार विभागाकडे द्यावी.

आधार क्रमांक, बँक तपशील, OTP यांसारखी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये.

एजंट / मध्यस्थांसाठी इशारा

शासनाच्या योजनांबाबत चुकीची माहिती देऊन कामगारांची दिशाभूल करू नये. कामगारांची फसवणूक, आर्थिक शोषण किंवा बनावट अर्ज केल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तक्रार आल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाहीही केली जाईल.

कामगारांना नोंदणी, नूतनीकरण व अर्ज प्रक्रिया सोप्या भाषेत समजावून सांगणारी माहिती देखील उपलब्ध करून देण्यात आली असून, कामगारांनी ती पाहूनच अर्ज करावा व दलालांच्या भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त आशिष ढवळे यांनी केले आहे.

AMC24 News 📰🗞️

मुख्य संपादक

अरविंद चाहादे घुग्घूस

9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular