मौजा .बोढेगांव येथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त “छळ” नाट्यप्रयोगाचे यशस्वी सादरीकरण*_*
_*माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते नाटकाचे उद्घाटन सपन्न*_

ब्रम्हपुरी/।
AMC24 News 📰 🗞️
अमित कनाके। तालुका प्रतिनिधि ब्रह्मपुरी
_तालुक्यातील बोढेगांव येथे श्री संत गजानन महाराज मंदिर व्यवस्थापन कमेटी यांच्या सौजन्याने”छळ” या तीन अंकी नाटकाचे आयोजन करण्यात आले. *या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.*_
_या कार्यक्रमाचे अध्यक्ष.दामोधरजी सिंगाडे आदर्श वि.वडसा,या कार्यक्रमाचे सत्कार मुर्ती.राऊत सर ज्ञा.पा.वि.बेटाळा,या कार्यक्रमाचे रंगमंच पुजक.गजानन सेलोटे कोंढाळा, सुभाष नाकतोडे उदापुर,हेमंत बुल्ले वडसा, सुनील धांडे पिंपळगाव,नंदकीशोर खापरे विस्तार अ.ब्रम्हपुरी,मंगेश नन्नवरे सरपंच बोढेगांव,विक्की लांडगे इंजि.चिंचोली,ईश्वर मेश्राम चिखलगांव .,या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष.प्रेमलाल धोटे ठेके.झिलबोडी,मोरेश्वर दर्वे सोनेगाव,संजिव मिसार ठेके.बेटाळा,या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे.विनोद राऊत उदापूर, चरणदास गडे पो.पा.बोढेगांव,राजु दिघोरे ठेके.सोनेगांव, सचिन राऊत बेटाळा,मोरेश्वर नन्नवरे ज्ञा.पा.वि.बेटाळा,रामलाल ढोरे उपसरपंच ग्रा.प.चिंचोली,उत्तम बगमारे खरकाडा,रमेश नन्नवरे ग्रा.प.सदस्य.बोडेगांव, सुधीर नन्नवरे,धर्माजी नन्नवरे, गणेश नाकतोडे उदापूर, गजानन ढोरे,मधु बुल्ले किन्ही,बंडु बुल्ले नैनपुर,प्रभाकर बुल्ले, शांताराम चौके, राजकुमार शेन्डे,अन्य मान्यवरांचीही उपस्थिती होते._
_उद्घाटनप्रसंगी प्रमोदभाऊ चिमूरकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, “श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा सहभागी होण्यासाठी हा दिव्य उत्सव आज्ञात्मिक उन्नती सामूहिक भक्ती आणि माऊलींच्या चरणी समर्पण करण्याचा काळ आहे कारण आपण त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि आपल्यामध्ये त्यांची जीवंत उपस्थिती अनुभवण्यासाठी एकत्र येतो.असे संबोधित केले अश्या नाट्यप्रयोगांच्या माध्यमातून स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळते आणि त्यांच्या कलागुणांना चालना मिळते. ‘छळ हे नाटक केवळ मनोरंजनासाठी नसून समाजाला विचार करायला लावणारा संदेश देते. या उपक्रमातून समाजातील एकात्मता वृद्धिंगत होते आणि कलेला नवीन दिशा मिळते. आपण सर्वांनी एकत्र येऊन अशा उपक्रमांना पाठिंबा द्यावा, ज्यामुळे आपली संस्कृती अधिक संपन्न होईल.”_
_श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आयोजित “छळ” या नाटकाचा बोढेगांव येथील नागरिकांनी मनमुराद आनंद लुटला. या यशस्वी आयोजनासाठी श्री संत गजानन महाराज मंदिर व्यवस्थापन कमेटी मंडळाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले._
AMC24 News 📰 🗞️
मुख्य संपादक
अरविंद चाहादे घुग्घूस
9405714165



