Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिवाळीत अंधार : राजुरा वनपरिक्षेत्रातील PRT मजुरांचे मानधन रखडले; उपासमारीची वेळ. ...

दिवाळीत अंधार : राजुरा वनपरिक्षेत्रातील PRT मजुरांचे मानधन रखडले; उपासमारीची वेळ. तात्काळ मानधनासाठी जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटेंचे वनमंत्र्यांना निवेदन.

दिवाळीत अंधार : राजुरा वनपरिक्षेत्रातील PRT मजुरांचे मानधन रखडले; उपासमारीची वेळ.

तात्काळ मानधनासाठी जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटेंचे वनमंत्र्यांना निवेदन.

 

AMC24 News ️

मुख्य संपादक.

अरविंद चाहादे घुग्घुस     9405714165

राजुरा (ता. प्र.) :– राजुरा वनपरिक्षेत्रातील चुनाळा, बामणवाडा, कोहपरा, चनाखा, सातरी, नलफडी, कापणगाव, शिरशी या गावांतील प्राथमिक प्रतिसाद पथक (Primary Response Team – PRT) म्हणून कार्यरत असलेल्या सुमारे ४० मजुरांचे जवळपास डिसेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील दिड वर्षाचे मानधन रखडले असून, यामुळे या मजूर कुटुंबीयांवर दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात उपासमारीची वेळ आली आहे.
वनविभागाच्या तातडीच्या कामात शासकीय कर्मचाऱ्यांसोबत दिवस-रात्र जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या या PRT सदस्यांना त्यांच्या परिश्रमाचा मोबदला महिनोन्‌महिने मिळालेला नाही. अनेकदा वनविभागाच्या स्थानिक कार्यालयात धावपळ करूनही केवळ आश्वासनेच मिळत असून, प्रत्यक्षात मानधन देण्यास स्थानिक स्तरावर टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर या सर्व पी. आर. टी. सेवकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विकास देवाळकर आणि नलफडी चे सरपंच अमित टेकाम यांच्या माध्यमातून माजी आमदार सुभाष धोटे यांना भेटून या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी विनंती केली. सदर अत्यंत संवेदनशील विषय लक्षात घेऊन माजी आमदार सुभाष धोटे यांनी वनमंत्री गणेश नाईक आणि प्रधान सचिव मिलिंद महेशकर यांना निवेदन देऊन संबंधित मजुरांचे मानधन तत्काळ अदा करण्याची मागणी केली आहे. धोटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, जिवाची पर्वा न करता वनसंवर्धन व आग नियंत्रणासाठी कार्यरत असणाऱ्या या मजुरांना त्यांच्या हक्काचे मानधन मिळणे ही अत्यावश्यक बाब आहे. मानधन रखडल्यामुळे कुटुंबांवर उपासमारीची वेळ येणे ही अत्यंत गंभीर व मानवतेला लाज आणणारी गोष्ट आहे.
धोटे यांनी पुढे प्रधान सचिव (वने), मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर वनवृत तसेच उपवनसंरक्षक मध्यचांदा वनविभाग यांना देखील या संदर्भात पत्र पाठवून तातडीने निधी वितरित करण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे.
वनसंवर्धनाच्या अग्रभागी कार्यरत असलेल्या PRT सदस्यांना दिवाळीच्या दिवशीही आपल्या कुटुंबाचा दिवा लावता यावा, यासाठी शासनाने त्वरित हस्तक्षेप करून त्यांचे थकलेले मानधन देणे अत्यावश्यक असल्याचे मत स्थानिक नागरिकांनीही व्यक्त केले आहे.  

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular