Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedवणीतील शिवसैनिकांची आज सुटका; यवतमाळहून वणीपर्यंत शेतकऱ्यांचा जल्लोषात स्वागत सोहळा, आ. देरकरांचा...

वणीतील शिवसैनिकांची आज सुटका; यवतमाळहून वणीपर्यंत शेतकऱ्यांचा जल्लोषात स्वागत सोहळा, आ. देरकरांचा सरकारवर निशाणा

विशेष प्रतिनिधी वणी

AMC24 News ️

मुख्य संपादक. अरविंद चाहादे.   

  1. वणी     :     वणीतील आंदोलन प्रकरणात अटकेत असलेल्या शिवसैनिकांना अखेर न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर आज (१० ऑक्टोबर) सकाळी त्यांची सुटका करण्यात आली. यवतमाळ कारागृहातून मुक्त झाल्यानंतर वणीकडे परतताना अनेक गावांमधील शेतकऱ्यांनी आणि समर्थकांनी या शिवसैनिकांचे अभूतपूर्व स्वागत केले. ओला दुष्काळ घोषित करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या या कार्यकर्त्यांच्या सुटकेनंतर परिसरात जल्लोषाचे वातावरण आहे.
  2. ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठीचे आंदोलन
  3. ६ ऑक्टोबर रोजी वणी येथे झालेल्या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हाल मांडत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. आंदोलनाच्या वेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या ताफ्याला शिवसैनिकांनी अडवून रास्ता रोको केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल करत कार्यकर्त्यांना अटक केली.
  4. जामीन सुनावणीत ऍड. विप्लोव तेलतुंबडे यांची प्रभावी बाजू
  5. ९ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील ऍड. विप्लोव तेलतुंबडे यांनी सर्व अटकेत असलेल्या शिवसैनिकांची बाजू ठामपणे मांडली. त्यांनी न्यायालयात सांगितले की,
  6. “हे आंदोलन पूर्णपणे शांततेत झाले होते. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी केलेल्या आंदोलनाला गुन्हेगारी कृत्य म्हणून रंगवणे हा सरळ अन्याय आहे.”
    न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून सर्व आरोपींना जामीन मंजूर केला.
  7. आजची सुटका आणि जल्लोषमय स्वागत
  8. आज सकाळी यवतमाळ कारागृहातून शिवसैनिकांची सुटका झाल्यानंतर त्यांचा मार्ग यवतमाळ–कळम–राळेगाव–खैरी–वडकी–मार्डी–नांदेपेरा–वणी असा होता. या मार्गावरील प्रत्येक गावात शेतकरी आणि नागरिकांनी फुलांच्या वर्षावात व घोषणांच्या गजरात शिवसैनिकांचे स्वागत केले. “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे,” अशा घोषणा वातावरणात घुमत होत्या. यावरून सरकार प्रति शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष दिसून येत होता.
  9. आघाडीवर असलेले कार्यकर्ते
  10. या आंदोलनात आणि सुटकेनंतरच्या स्वागत सोहळ्यात शिवसेना (उबाटा गट) चे जिल्हाप्रमुख संजय निखाडे, तालुकाप्रमुख संतोष मारेगाव, तालुकाप्रमुख पुरुषोत्तम बुटे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप काकडे, माजी नगरसेवक राजू तुरंकर, तसेच प्रेमा धानोरकर, गणपत लेडांगे, भगवान मोहिते, जगन जुनगरी, संकेत मोहिते, मोहम्मद अन्सार, मनीष बत्रा, दिवाकर कोल्हेकर आदींचा समावेश होता.
  11. शिवसेनेचा सरकारवर निशाणा
  12. सुटकेनंतर स्थानिक शिवसेना आमदार संजय दरेकर यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की,—“शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला, पण अखेरीस सत्याचा विजय झाला. शिवसेना शेतकऱ्यांसाठीचा लढा अधिक जोमाने लढत राहील.”
  13. जनतेचा विजय, शेतकऱ्यांचा अभिमान
  14. या संपूर्ण घटनेने वणी तालुक्यात उत्साह आणि अभिमानाची लाट उसळली आहे. शेतकरी, नागरिक आणि शिवसेना समर्थक सर्वांनी मिळून हा दिवस “शिवसैनिकांचा विजय दिवस” म्हणून साजरा केला.
  15.       मुख्य संपादक अरविंद चाहादे 

9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular