विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तहसील कार्यालयाजवळ बौद्ध सर्कल समिती व नव बौद्ध सर्कल समिती यांच्या माध्यमातून सभा घेण्यात आले .

AMC24 News ️
मुख्य संपादक। अरविंद चाहादे
घुग्घूस। सुप्रीम कोर्ट चे सरन्यायाधीशावर हल्ला झालेला विरोधात निषेध करण्यात आले .सुप्रीम कोर्ट सरन्यायाधीशावर भ्याड हल्ला करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावे. अशी मागणी बौद्ध सर्कल समिती घुग्घूस यांच्यातर्फे करण्यात आल्या
सुप्रीम कोर्ट चे सरन्यायाधीश माननीय बी.आर. गवई यांच्यावर दिनांक 6 ऑक्टोंबर 2025 ला सुप्रीम कोर्टात सुनावणी दौरान एका माते फिरू मनुवादी विचाराचा एडवोकेट राकेश किशोर नावाचा व्यक्तीने सर न्यायाधीश यांच्यावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला. न्यायपालिकेच्या सर्वोच्च न्यायालयात पदावर असणाऱ्या पद व गरिमा यांच्यावर हल्ला करणे ही फार मोठी गंभीर बाब आहे.हल्ला करणारा हा मनुवादी विषमतावादी व्यक्तींना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा . अशी मागणी नव बौद्ध स्मारक समिती व बौद्ध सर्कल समिती यांच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे पोलीस स्टेशन घुग्घूस च्या माध्यमातून निवेदन देण्यात आले. या सभेची सुरुवात त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना घेऊन करण्यात आले काही मान्यवरांनी आपले विचार मांडले यात प्रामुख्याने आयु.भीमेंद्र कांबळे. आयु.दीप्ती सोनटक्के ,आयु. गंगाधर गायकवाड,आयु.श्याम कुमरवार ,आयु.उर्मिला लिहितकर,आयु. रमाबाई सातार्डे,यांनी आपले मनोगतातून विरोध दर्शविला
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. सुजित सोनटक्के यांनी केले.





