Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedघुग्घूस नगराध्यक्ष पदी विराजमान होणार अनुसूचित जाती महिला प्रवर्गातील अध्यक्ष.

घुग्घूस नगराध्यक्ष पदी विराजमान होणार अनुसूचित जाती महिला प्रवर्गातील अध्यक्ष.

 

AMC24 News

घुग्घूस।       आज दिनांक। .६  रोज सोमवारला मुंबई येथे पार पडलेल्या नगराध्यक्ष पदाच्या सोडतीत घुग्घूस नगर परिषदमध्ये अनुसूचित जाती महिला आरक्षित झाली असून अनेक इच्छुकांच्या, नवागतांच्या, प्रदीर्घ अनुभवी दिग्गजांच्या आशा पल्लवित होऊन त्यांनी आज खऱ्या अर्थाने सुटकेचा श्वास घेतला.

घुग्घूस नगर परिषद ३१ डिसेंबर २०२०मध्ये अस्तिवात आली तेव्हापासून आजतागायत प्रशासक तर मुख्याधिकारी अशी मक्तेदारी घुग्घूस नगर परिषदेवर राहिलेली आहे. यावेळी नवनिर्वाचित घुग्घूस नगर परिषदेवर कोणता पक्ष व कोणती उमेदवार बाजी मारेल हे काळच ठरवेल.

 

ग्रामपंचायत बरखास्त करून ३१ डिसेंबर २०२२ रोजी प्रशासकीय नंतर मुख्याधिकारी अशी कारकिर्द सुरू झाली आणि वॉर्ड सदस्य व सरपंच अश्या लोकप्रतिनिधी अभावी शहराचा उलट गतीने विकास सुरू असल्याचा प्रशासकीय व मुख्याधिकारीचा अनुभव जनतेला आला. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाला ३१ जानेवारी २०२६।  पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करावयाची असल्याने प्रभाग रचने पाठोपाठ आज दिनांक ६ ऑक्टोबर रोज सोमवारला राज्यात नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानुषंगाने घुग्घूस नगर परिषदेवर नगराध्यक्ष पदी महिला म्हणजेच अनुसूचित जाती महिला प्रवर्गातील यावर शिक्कामूर्तब झाले

 

नगराध्यक्ष पद जाहीर झाले आता वॉर्ड निहाय अनुसूचित जाती, जमाती,महिला व नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग महिला , सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत दिनांक ८ ऑक्टोबर रोज बुधवारला पार पडेल. यानंतर खऱ्या अर्थाने घुग्घूस च्या राजकारणात रंगत येईल,नाट्याचा दुसरा अंक सुरू होऊन परत काय घडामोडी घडेल तूर्तास नगराध्यक्ष पद आरक्षण जाहीर झाल्याने तर्क वितर्क ना विराम मिळाला आहे.

 

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular