Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedआझाद चौकातून गावोगावी पोहोचते अवैध देशी दारू गावोगावी देशी दारू पोचवणाऱ्या...

आझाद चौकातून गावोगावी पोहोचते अवैध देशी दारू गावोगावी देशी दारू पोचवणाऱ्या रॅकेटवर प्रशासनाची मौनव्रती

*आझाद चौकातून गावोगावी पोहोचते अवैध देशी दारू*

 

*गावोगावी देशी दारू पोचवणाऱ्या रॅकेटवर प्रशासनाची मौनव्रती*

AMC24 News ️ ️

मुख्य संपादक.   अरविंद चाहादे

9405714165

राजुरा | तालुक्यातील आझाद चौक हा दिवसाढवस उघड्यावर चालणाऱ्या बेकायदेशीर देशी दारू वितरणाचा मुख्य अड्डा बनला असून, येथून गावोगावी दारूचे घरोघर डिलिव्हरीचे जाळे विणले गेले आहे. नागरिक, व्यापारी आणि सामाजिक संघटना वारंवार तक्रारी करत असतानाही प्रशासनाने ठोस कारवाईचा पवित्रा घेतलेला नाही. परिणामी कायद्याला जुमानत नाही अशा दारू माफियांचे धाडस दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, आझाद चौकातून दररोज रात्री उशिरापर्यंत दारूच्या पेट्या व बाटल्या बेकायदेशीररित्या वेगवेगळ्या गावांकडे रवाना होतात. या संपूर्ण चक्रामध्ये काही प्रभावशाली व्यक्ती व स्थानिक राजकीय छत्रछाया मिळत असल्याचा संशय नागरिकांमध्ये आहे. ग्रामीण भागात लहानग्या मुलांपासून तरुणांपर्यंत व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असून, त्यातून घरगुती कलह, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि आर्थिक कंगालीत भर पडत आहे.

गावोगावच्या महिलांनी आणि शेतकरी संघटनांनी यावर कडाडून आवाज उठवला आहे. अनेकवेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार पोचली, पोलिस ठाण्याला निवेदनं देण्यात आली; मात्र कारवाईचे फक्त दाखवण्यासाठीचे पाऊल उचलले गेले. छापे घातले तरी लहानसहान विक्रेत्यांवर कारवाई करून मुख्य जाळे मात्र कायम अबाधित ठेवले जाते. हे चित्र नागरिकांमध्ये प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल संताप निर्माण करत आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी दारूबंदी मोहिमेच्या नावाखाली जिल्ह्यात मोठ्या धडक कारवाया केल्या जातील असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती पूर्ववत राहिल्याने ही आश्वासने फक्त कागदावरच राहिल्याचे स्पष्ट होत आहे.

राजुरा आझाद चौक हा पोलिसांच्या नजरेआड कसा राहतो, इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वाहतुकीला कोण संरक्षण देत आहे, हे प्रश्न आता जनतेसमोर उभे ठाकले आहेत. कायद्याचे रक्षणकर्तेच जर अशा बेकायदेशीर धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असतील, तर नागरिकांनी विश्वास कुणावर ठेवावा, हा मूलभूत प्रश्न निर्माण झाला आहे.

सामाजिक बांधिलकीचा आग्रह धरत नागरिक आता थेट जिल्हाधिकारी व राज्य शासनाकडे धडक देण्याच्या तयारीत असून, प्रशासनाला जागे केले नाही तर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही दिला जात आहे.      


 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular