घुग्घूस. विशेष प्रतिनिधी
AMC24 News. मुख्य संपादक
अरविंद चाहादे घुगुस 9405714165
घुग्घूस शहरात बनावट इन्कम टॅक्स रिटर्न्स वेकोलीच्या कामगारांना व शासकीय कर्मचाऱ्यांना बनवून देऊन. लोकांना फसवणूक हवा जोर पकडत आहे
20 हजार पासून ते 3 लाख रुपयापर्यंतचा लाभ मिळवून देत 30 टक्के कमिशन घेत असल्याची खमंग चर्चा शासकीय कर्मचारी व वेकोली कामगारात दबक्या आवाजात बोलली जात आहे.!
आयकर रिटर्न भरना सुरु असून याचा फायदा घेत सायबर गुन्हेगार वेकोलीचे कामगार व शासकीय कर्मचाऱ्यांना आकर्षित ऑफर किंवा त्वरित परतफेड देऊन आकर्षित करत असून यातून लाखो रुपयाची माया जमविली आहे. विशेष म्हणजे हे सर्व रिटर्न एकाच ई -मेल आयडीवरून किंवा वेगवेगळ्या आयडीवरून भरले जात असून यामध्ये कॅन्सर किंवा किडनी आजार फेल्युअर NPS पेन्शन आणि यासारख्या गंभीर आजाराचा खोटा दावा करून इन्कम टॅक्स विभागाची फसवूनक करण्यात येऊन शासनाला करोडो रुपयाचा चुना लावत असल्याची चर्चा आहे.
टॅक्स रिटर्नमध्ये खोटा मेडिकल बनाव करून लाखो रुपये टॅक्स सवलत मिळवून दिल्याचा गंभीर आरोप वेकोली कामगार व शासकीय कर्मचारी करीत आहे. तसेच एकदा AY 2014 ते AY 2015 या वर्षांपासून income tax Return रिवाईस करून त्याला 1ते 2 लाखापर्यंत REFUND घेण्यात आले होते आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ने नागपूरला सुद्धा लोकांना बोलवण्यात आले होते तरी इन्कम टॅक्स विभागाने आर्टिफिशियल इंटेलीजन्स च्या मदतीने रिटर्न्सची सखोल चौकशी करावी म्हणजे हा प्रकार उघडकीस येईल. कलम 80 DDB नुसार टर्मिनल इलणेस म्हणजे बरे न होणारे गंभीर आजार झाल्यास सवलत कर दिली जाते. ही सवलत रुग्णाच्या कुटूंबियांनाही लागू होते आणि त्याचाच गैरफायदा घेत खोटे इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्यात आल्याची चर्चा आहे.तरी याची सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे




