घुग्घूस काँग्रेस तर्फे दिवंगत खा. बाळू धानोरकर यांची जयंती साजरी
नवी दिशा वृद्धाश्रमात फळ वाटप
करीत साजरी केली जयंती
घुग्घूस : चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा क्षेत्रातील दिवंगत लोकप्रिय खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या जयंती निमित्त काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली नवी दिशा वृद्धाश्रमात बाळू धानोरकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून तसेच प्रार्थना करून आदरांजली अर्पित करण्यात आली.
तसेच वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना फळ वाटप करण्यात आले.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा सचिव अजय उपाध्ये, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष रोशन दंतलवार,एस्सी सेल तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा, तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास गुडला, विजय माटला, सुनील पाटील, दिपक कांबळे, कपिल गोगला, कुमार रुद्रारप, अंकुश सपाटे, दिपक पेंदोर, अरविंद चहांदे, गणपत लभाने व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
AMC24 News.
मुख्य संपादक अरविंद चाहादे घुग्घूस
9405714165




