महावितरण तर्फे बहिरम बाबा नगर वॉर्डातील लो वोल्टजची समस्येचे निवारण
काँग्रेसच्या मागणीला यश!
घुग्घूस : शहरातील बहिरम बाबा नगर वॉर्डात गेल्या अनेक दिवसापासून भर उन्हाळ्यात नागरिकांच्या घरातील फॅन कूलर यांना पुरेसा वीज पुरवठा मिळत नसल्याने त्यांनी काम करने बंद केल्याने नागरिक प्रचंड त्रस्त झाले होते.
काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार यांनी संपूर्ण वॉर्ड वासियांच्या स्वाक्षरीचे निवेदन बनवून काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांना दिले असता त्यांनी तातळीने महावितरण कार्यलयात जाऊन मुख्य अभियंता यांची भेट घेऊन तातळीने ही गंभीर समस्या निकाली काढण्याची सूचनावजा विनंती केली असता महावितरण कार्यलयाने तातळीने सदर परिसरात दोन नवीन विद्युतपोल लावून थ्री फेजचे करंट अन्य ठिकाणावरून देऊन ही समस्या कायमस्वरूपी निकाली काढल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला व रेड्डी यांचे आभार मानले.
AMC24 News. मुख्य संपादक .
अरविंद चाहादे घुगुस.
9405714165.



