Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedआ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आरोग्य शिबिर

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आरोग्य शिबिर

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आरोग्य शिबिर.

AMC24 News घुगुस  मुख्य संपादक अरविंद चाहादे

9405714165

चंद्रपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून बल्लारपूर तालुक्यातील आसेगाव गीलबिली येथे आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 173 लोकांनी नोंदणी केली. तपासणीनंतर ज्यांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान झाले, अश्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे रवाना करण्यात येणार आहे.

या आरोग्य शिबिराचे आयोजन श्री माता कन्यका सेवा संस्था, चंद्रपूर आणि शालिनीताई मेघे वानाडोंगरी हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी श्री माता कन्यका सेवा संस्थेचे सचिव राजेश्वर सुरावार, शैलेंद्र सिंग बैस, गिलबिलीचे सरपंच गोपिका बुरांडे, रुपदास सिडाम,उपसरपंच बळीराम मेश्राम,कू.ज्योती वेलके, रामकुमार आक्कापेलीवार, रमेश पाटील, धुरपदा मेश्राम,गजानन पिंपळशेंडे, कृष्णा गाद्देवार, वृषाली गेडाम, मंगला शेंडे, शालिनी कोवे आदिंची उपस्थिती होती.

आसेगाव गिलबिली येथे आयोजित आरोग्य शिबिरात एकूण १७३ नागरिकांची नोंदणी झाली. तपासणीनंतर ७३ रुग्णांना नेत्र शस्त्रक्रियेसाठी नागपूरच्या वानाडोंगरी येथील रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. यावेळी, शिबिरात ११ रुग्णांची ईसीजी तपासणीही करण्यात आली.आ. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून या महिन्यात विसापूर, नांदगाव, हळस्ती, बामणी, कळमना, जूनोना, चीचपेल्ली, अजयपूर, कोठारी, दुर्गापूर, इंदिरा नगर, राजोली आणि मुल येथे मोफत नेत्र तपासणी शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये रुग्णांनी मोठ्या संख्येने नेत्र तपासणी केली.

आ. मुनगंटीवार यांची आरोग्यसेवेतील निःस्वार्थ धडपड
आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या सततच्या प्रयत्नांतून आयोजित विविध आरोग्य शिबिरांमुळे आतापर्यंत तब्बल ३५ हजार नागरिकांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर १५ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आली आहे, ही बाब उल्लेखनीय आहे.

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular