घुग्घूस शहरात बुद्ध गया महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात स्वाक्षरी अभियान व जाहिर पाठिंबा

AMC24 new घुग्घूस
—————————
घुग्घुस.
घुग्घुस. 28 फेब्रुवारी 2025 ला घुग्घूस शहरात संपूर्ण बौद्ध समाजातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आले. महाविहार मुक्ति आंदोलन बुद्धगया येथे अनिश्चित काल आमरण उपोषण करणाऱ्या पूजनीय भंते संघ व प्राध्यापक विलास खरात यांच्या नेतृत्वात सुरू असलेले आंदोलनाला बौद्ध सर्कल समिति व नव बौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समिती घुग्घूस यांच्या वतीने तसेच घुग्घूस परिसरात सर्व बौद्ध विहार व बौद्ध आस्थापना संघटनाच्या वतीने, नवयुवक बौद्ध मंडळ कॉ. नंबर 2, आम्रपाली बौद्ध विहार, रमाबाई बौद्ध महिला मंडळ कॉ. नंबर 2, सारीपुत बौद्ध विहार सुभाष नगर. जेतवन बौद्ध विहार आंबेडकर नगर, रमाई महिला मंडळ अमराई वार्ड, महाप्रज्ञा विहार मंडळ इंदिरानगर,श्रावस्ती बौद्ध परिसर, बहुउद्देशीय गौतमी महिला मंडळ केमिकल वार्ड, मिलिंद वाचनालय तुकडोजी नगर, बाबासाहेब आंबेडकर भवन लुंबिनी नगर, बौद्ध सत्व विहार कमिटी शांतीनगर, अष्टविनायक संस्था घुग्घूस,बोधिसत्व मैत्री संस्था घुग्घूस, नवयुवक बौद्ध मंडळ पांढरकवडा, या सर्व मंडळांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर येथे सर्वप्रथम पुष्प अर्पण करून मेणबत्ती अगरबत्ती लावून त्रिशरण बुद्ध वंदना घेण्यात आले. व सभेचे आयोजन करण्यात आले या सभेत काही मान्यवरांनी आपले मनोगत विचार मांडले यात प्रामुख्याने आयु. भीमेंद्र कांबळे.आयु. नागेश पथाडे, आयु.भारत जीवने,आयु.श्याम कुमरवार,आयु. दीप्ती सोनटक्के, आयु.उर्मिला लिहितकर,आयु. सुरेखा टिपले, आयु.कुसुमबाई सातपुते, आयु.रजनी ताई टिपले,आयु. रमाबाई सातार्डे, आयु.सुरेखा टिपले,या सर्वांनी महाविहार मुक्ती आंदोलनाचा इतिहासाबद्दल माहिती सांगितले. महाविहार मुक्ति आंदोलना जवळपास 144 वर्षे झाले. या आंदोलनाचे प्रनेता पूजनीय भंतेजी अनागरिक धम्मपाल यांनी वर्ष 1881ला या आंदोलनाला सुरुवात केली आणि त्यानंतर अनेक मान्यवरांनी आंदोलने केले. पूजनीय भंते सुरई ससाई ,मुकुंद खैरे असे अनेकांनी आंदोलन केले.आणि आजच्या घडीला दिनांक 12 फेब्रुवारी 2025 पासून बुद्धगया येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे त्याच्या समर्थनार्थ निवेदन पत्र व जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आले. बिहार सरकार व केंद्र सरकारनी या विषयाला गंभीरतेने घेऊन 1949 ही कायदा रद्द करून महा बौद्ध विहार बुद्धगया संपूर्णपणे बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावे.करिता पोलीस ठाणेदार ,घुग्घूस यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती भारत सरकार, भारताचे पंतप्रधान, बिहार राज्याचे मुख्यमंत्री या सर्वांना स्वाक्षरी अभियानाची प्रत व प्रत्येक विहार मंडळाचे समर्थन पत्र देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. सुजित सोनटक्के यांनी केले व आभार प्रदर्शन अशोक रामटेके यांनी मानले.
AMC24 new घुग्घूस
मुख्य संपादक अरविंद चाहादे
9405714165



