Tuesday, June 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedलॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशन आणि लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट द्वारे चंद्रपूरात जिल्हास्तरीय "शिक्षण...

लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशन आणि लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट द्वारे चंद्रपूरात जिल्हास्तरीय “शिक्षण महोत्सव” _(एक दिवस शिक्षकांसाठी) जल्लोषात संपन्न*

*लॉयड्स इन्फिनाईट फाऊंडेशन आणि लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट द्वारे चंद्रपूरात जिल्हास्तरीय “शिक्षण महोत्सव” _(एक दिवस शिक्षकांसाठी) जल्लोषात संपन्न*

AMC24 new घुग्घूस.

रविवार, दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी शिव पार्वती हॉल, आकाशवाणी रोड चंद्रपूर येथे लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट आणि लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन तर्फे जिल्ह्यातील शिक्षकांना आपल्या प्रतिभा व कलांचे सादरीकरण करण्यासाठी, जिल्हा भरातील शिक्षकांना जोडणाऱ्या शिक्षण महोत्सव या मंचाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सुलेखन, निबंध लेखन, वक्तृत्व, भित्तीपत्रके, टाकाऊ पासून टिकाऊ, गीत गायन, काव्य वाचन, वैयक्तिक नृत्य, समुह नृत्य अशा ९ स्पर्धांचे आयोजन केल्या गेले. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील १५ ही तालुक्यातील ८२ शासकीय, निमशासकीय आणि खाजगी शाळा व महाविद्यालयांतील एकूण १८० शिक्षकांनी तब्बल ३८२ स्पर्धांसाठी सहभाग घेतला. कार्यक्रमस्थळी स्पर्धकांसोबत प्रेक्षकांची चांगलीच गर्दी जमली. अडीचशेहून अधिक लोकांनी यामध्ये हजेरी लावली. यामध्ये शिक्षकांनी आपल्या अंगी असलेले कलागुण आणि प्रतिभा दाखवल्या. कार्यक्रमादरम्यान सर्व सहभागीमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. कार्यक्रमामध्ये एकूण २४ विजयी स्पर्धक तर ३ समुह स्पर्धकांचा सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. विजेत्यांसोबतच सर्व सहभागी शिक्षकांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाला लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचे शिक्षण विभाग प्रमुख श्री. सुधीरकुमार गजभिये, लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशनचे उपव्यवस्थापक श्री. दिपक साळवे व समन्वयिका कु. नम्रपाली गोंडणे, केंद्र प्रमुख श्री. मुत्त्यालवार, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या व्यवस्थापिका सौ. कांचन थोरवे, समन्वयीका सारिका राऊत, समन्वयक मुकेश भोयर, GD गोयंका लॉयड्स पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सौ. जेसी रॉय आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये झालेल्या स्पर्धांचे परीक्षण, कवी व लेखक श्री. संजय येरणे, साहित्यिक व अनुवादक श्री. प्रदीप देशमुख, गायन विशारद सौ. मयुरी पहानपटे, संगीत विशारद श्री. नंदराज जिवनकर, कत्थक विशारद डॉ. एकता कुरेकर, कत्थक विशारद सौ. पूनम झा या परीक्षकांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अर्चना नागपुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सारिका राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या सर्व टीमने कठीण परिश्रम घेतले.

AMC24 new घुग्घूस 9405714165.

मुख्य संपादक अरविंद चाहादे घुग्घूस

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular