Thursday, October 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedवोट चोर, गद्दी छोड’च्या घोषणांनी घुग्घूस दणाणले!

वोट चोर, गद्दी छोड’च्या घोषणांनी घुग्घूस दणाणले!

वोट चोर, गद्दी छोड’च्या घोषणांनी घुग्घूस दणाणले!

घुग्घूस, दि. ८ ऑक्टोबर २०२६

AMC24 News 📰 🗞️

: मतदार यादीतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून घुग्घूस शहर काँग्रेस कमिटीने गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. शहर काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी व नगराध्यक्ष दिप्ती सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.‘वोट चोर, गद्दी छोड’, ‘ज्ञानेश कुमार राजीनामा दो’ अशा घोषणांनी संपूर्ण चौक दणाणून गेला. हातात फलक

, घोषणांचा गजर आणि संतप्त कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे आंदोलनाने जोरदार वातावरण निर्माण झाले.काँग्रेस कार्यकर्त्यांनी आरोप केला की, एस.आय.आर.च्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळण्यात आली असून लाखो बोगस मतदारांची नावे मतदार यादीत जोडण्यात आली आहेत. या कथित प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचा दावा काँग्रेसने केला.

मतदारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न?
मतदार हा लोकशाहीचा केंद्रबिंदू आहे. त्याचे नाव मतदार यादीत असणे आणि त्याला निर्भयपणे मतदानाचा अधिकार मिळणे हा लोकशाहीचा मूलभूत आधार आहे. त्यामुळे मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी काँग्रेसने केली.निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी पारदर्शकता आवश्यक असून, मतदारांच्या हक्कांशी तडजोड सहन केली जाणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली

काँग्रेसचा इशारा—संघर्ष थांबणार नाही!
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील या आंदोलनातून काँग्रेसने निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला. मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. 

आंदोलनात आरोग्य सभापती नूरुल सिद्दिकी, ज्येष्ठ नेते शामराव बोबडे, नगरसेवक दिलीप विठ्ठलवार, नगरसेविका वैशाली चिकनकर, आशाताई पानघाटे, पल्लवी घुले, सुनीता पेंदोर, अर्चना सारोकर, काँग्रेस जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार यांच्यासह गजानन मासिरकर, दिनेश घुले, गणेश पानघाटे, अजय पाटील, विशाल मादर, रोहित डाकूर, देव भंडारी, प्रशांत सारोकर, दीपक पेंदोर, दीपक कांबळे, अरविंद चहांदे, सुनील पाटील, हेमा रापेल्ली, आयेशा बुखारी, विशाल खैरे, सरिता खैरे, दुर्गा पाटील, सरस्वती कोवे, पूनम कांबळे, प्रीती तामगाडगे, रुचिता धोटे, संध्या मंडल, दिनेश घागरगुंडे, शहंशाह शेख यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

AMC24 News 📰 🗞️

मुख्य संपादक

अरविंद चाहादे घुग्घुस

9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular