घुग्घुस नगर परिषदेविरोधात भाजपा नगरसेवकांचे ‘एप्रिल फुल’ आंदोलन
नगर परिषद शहर वासियांना बनवीत आहे एप्रिल फुल: विवेक बोढे

AMC24 News 📰 🗞️
घुग्घुस: येथील नगर परिषदेविरोधात बुधवार, २९ एप्रिल रोजी दुपारी १:३० वाजता नगर परिषद कार्यालयात भाजपा नगरसेवकांनी ‘एप्रिल फुल’ आंदोलन केले.

यावेळी घुग्घुस नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार नरेबाजी करण्यात आली. ४ महिने पूर्ण होऊन सुद्धा एकही विकासकाम न करण्याऱ्या व घुग्घुसच्या शहर वासियांना ‘एप्रिल फुल’ बनवणाऱ्या नगर परिषदेच्या सत्ताधाऱ्यांचा जाहीर निषेध करण्यात आला.

याप्रसंगी भाजपा नगरसेवक विवेक बोढे म्हणाले, घुग्घुस नगर परिषद शहर वासियांना ‘एप्रिल फुल’ बनवत आहे. ६ कोटींचा निधी शासनाला परत गेला, आरो मशीन सुरु नाही, विकासनिधी आणला नाही, नवीन मजुर घेतले नाही, पथदिवे बंद आहे, हातपंप दुरुस्त केले नाही, मासिक सभा महिन्याच्या शेवटी घेण्यात येते, स्वच्छता करण्यात येत नाही अश्या विविध समस्या पूर्ण करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. ‘एप्रिल फुल’ बनाया हे गाणे वाजवून मुख्याधिकाऱ्यांना ‘एप्रिल फुल’ देण्यात आले

यावेळी भाजपाचे नगरसेवक विवेक बोढे, गटनेत्या मिना मोरपाका, स्वीकृत नगरसेवक निरीक्षण तांड्रा, नगरसेविका वैशाली ढवस, नगरसेविका चैताली सातपुते, भाजपा नेते अमोल थेरे, गणेश कुटेमाटे, बबलू सातपुते, राजेश मोरपाक, सुरेंद्र जोगी, अनिल नित, धनराज पारखी, प्रणय काटवले, नितीन काळे, सचिन नांदे, तुलसीदास ढवस, हेमंत पाझारे, उमेश दडमल, पांडुरंग थेरे, मुस्तफा शेख, अण्णा कदम, बंटी आगदारी, अजय लेंडे, कोमल ठाकरे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
AMC24 News 📰 🗞️
मुख्य संपादक अरविंद चाहादे
घुग्घूस 9405714165



