घुग्घूस येथील इंडेन गॅस येथे सिलेंडर करीता ग्राहकांच्या रांगा
भर उन्हात सिलेंडर करीता नागरिकांची प्रतीक्षा
तातळीने गॅस उपलब्ध करून द्या :- राजुरेड्डी

AMC24 News 📰 🗞️
घुग्घूस : केंद्रातील मोदी शासन व राज्यातील फडणवीस शासन सांगत आहे की देशात व राज्यात कुठे ही गॅस सिलेंडरची टंचाई नाही.
मात्र घुग्घूस शहरातील देवनील इंडेन गॅस येथील परिस्थिती अंत्यन्त भयावह असून नागरिकांना गॅस मिळत नसून लांबच्या लांब लाईन आहे. भर उन्हात नागरिक सिलेंडरचा नंबर लावण्यासाठी रांगेत उभे आहे.
याठिकाणी महिलांन करीता वेगळी लाईन नसल्याने महिला व पुरुष एकाच रांगेत उभे होत आहेत.
याठिकाणी बसण्याची व पिण्याच्या पाण्याची ही व्यवस्था नाही.

आज घुग्घूस शहरातील नगराध्यक्ष दिप्ती सोनटक्के व उप – नगराध्यक्ष राजुरेड्डी यांनी गॅस एजेंसी येथे जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व एजन्सी कर्मचाऱ्यांशी गॅस उपलब्ध न होण्याची कारणे जाणून घेतली.

नागरिकांच्या साठी तातळीने पिण्याचे पानी व बसण्यासाठी जागा व महिलांना वेगळी रांग करून देण्याचे सुचविले व वरिष्ठ पातळीवर सुव्यव्यवस्थित रित्या गॅस पुरवठा करण्या संदर्भात जिल्हाधिकारी चर्चा करून समस्या सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न करण्यात येणार असल्याचे नागरिकांना हमी दिली व नागरिकांनी संयम सोडू नये सर्वांना गॅस सिलेंडर उपलब्ध होतील कुणी ही घाबरून जाऊ नये असे आवाहन केले.

याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, प्रशांत सारोकर, रोहित डाकूर, कुमार रुद्रारप, आयुष आवळे, साहिल आवळे व पदाधिकारी उपस्थित होते.
AMC24 News 📰 🗞️
मुख्य संपादक
अरविंद चाहादे घुग्घूस
9405714165



