बिअर शॉपच्या दुकानात दारु पिणे पडणार महागात!


AMC24 News 📰 🗞️
घुग्घूस:-येथील स्नेहप्रभा मंगल कार्यालय व इतर बिअर शॉप दुकानामध्ये दुकानदारांनी मद्यपींना दारु पिण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे बारमध्ये दारूचे दर वाढल्यामुळे कामगार व नागरिक बिअर शॉपी मध्ये जाऊन नशा करीत आहे.नियमानुसार मद्यपीना बिअर शॉपी मध्ये दारू पिण्यास जागा उपलब्ध करून दिल्यास संबंधित मद्यविक्री लायसन्सधारकासह मद्यपींवर देखील कारवाई करण्याचा नियम आहे मात्र नियम धाब्यावर बसून सर्रासपणे दारू पिण्यास जागा उपलब्ध करून दिली असून याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग(एक्साईज)मूग गिळून बसून आहे.
राज्य उत्पादक शुल्क च्या अधिकारी व कर्मचार्यांनी मद्यविक्री दुकानांची नियमित तपासणी करावी. लायसन्सधारकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. जे नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. राज्यातील मद्य लायसन्सधारकांना सीलबंद बाटलीतून मद्य घरी घेऊन जाण्यासाठी विक्रीची तरतूद आहे, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत. त्यामुळे बेकायदा मद्यविक्री करणार्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. ‘एक्साईज’चे निर्देश
ग्राहकांना बिअर शॉपमध्ये किंवा आसपासच्या परिसरात मद्य पिण्यासाठी जागा किंवा इतर सुविधा देवू नयेत. तसे केल्यास लायसन्सधारकावर कठोर कारवाई करावी. ज्या लायसन्सधारकांना मद्यविक्रीची परवानगी असताना दोन किंवा त्यापेक्षा जादा ग्राहकांना दुकानात किंवा दुकानाच्या काऊंटरवर मद्य पिण्यास दिल्याचे आढळल्यास संबंधित लायसन्सधारकावर गुन्हा नोंदवावा किंवा कारवाई करावी. नियमांचे उल्लंघन करुन परवानगी नसतानाही लायसन्सधारक मद्यविक्रेते दुकान किंवा आसपासच्या परिसरात ग्राहकांना बेकायदा दारु पिण्यास जागा उपलब्ध करणे व बेकायदा बाबींकडे नियंत्रण न आणणार्यांवर गस्त घालून कठोर कारवाई करावी. त्यानंतर बेकायदा बाबींवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची दक्षता संबंधित विभागीय उपआयुक्त व अधीक्षकांनी घ्यावी. मद्यविक्रीची परवानगी असताना दुकानाच्या जागेवर व परिसरात मद्यपी दारु पिताना आढळ्यास त्यांच्यावरही कारवाई करावी. एमआरपीप्रमाणे मद्यविक्री न करता जादा दराने विक्री करणार्या लायसन्सधारकावर कारवाई करावी. नियमभंग करणार्या लायसन्सधारकांविरुद्ध दर महिन्याला अचानक परजिल्ह्यातील व दुसर्या क्षेत्रीय अधिकार्यांच्या सहाय्याने संबंधित विभागीय उपआयुक्त व अधीक्षकांनी मोहीम राबवून राज्य दारुबंदी कायद्याची अंमलबजावणी करावी.
AMC24 News 📰 🗞️
मुख्य संपादक
अरविंद चाहादे घुग्घुस



