Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedमनोमिलन 2026 मध्ये समाजाचा अभिमान उंचावला;* *चार वर्षांच्या अधीर जुन्नावारचा राष्ट्रीय...

मनोमिलन 2026 मध्ये समाजाचा अभिमान उंचावला;* *चार वर्षांच्या अधीर जुन्नावारचा राष्ट्रीय सुवर्ण पराक्रम.. आर्य वैश्य समाजातर्फे सन्मान

*मनोमिलन 2026 मध्ये समाजाचा अभिमान उंचावला;*

*चार वर्षांच्या अधीर जुन्नावारचा राष्ट्रीय सुवर्ण पराक्रम.. आर्य वैश्य समाजातर्फे सन्मान

चंद्रपुर।         श्री विश्व कन्यका आर्य वैश्य समाज बहुउद्देशीय संस्था, रामनगर, चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “मनोमिलन 2026” उपवर-उपवधू परिचय मेळाव्यात समाजाचा अभिमान ठरलेल्या अवघ्या चार वर्षांच्या अधीर अमृता सुबोध जुन्नावार याचा राष्ट्रीय स्तरावरील इनलाईन स्केटिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या मेळाव्याच्या निमित्ताने केवळ विवाहयोग्य युवक-युवतींचा परिचयच नव्हे, तर समाजातील गुणवंत, कर्तृत्ववान आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्याची परंपरा समाजाने जपली असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

अधीर जुन्नावार हा चंद्रपूर येथील माउंट कार्मेल कॉन्वेंट स्कूल येथे नर्सरी वर्गात शिक्षण घेत असून, इतक्या लहान वयात त्याने इनलाईन स्केटिंग या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळवून चंद्रपूर शहरासह संपूर्ण आर्य वैश्य समाजाचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले आहे. विशेष म्हणजे, या वयोगटात राष्ट्रीय पातळीवर असे यश मिळवणारा अधीर हा दुर्मिळ उदाहरण ठरला आहे.

अधीरच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत मनोमिलन 2026 उपवर-उपवधू परिचय मेळाव्यात समाजाच्या वतीने त्याचा विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकारिणी समितीने अधीरला सन्मानचिन्ह देत त्याच्या उज्ज्वल भवितव्याबाबत शुभेच्छा दिल्या. यावेळी समाजबांधवांकडून टाळ्यांच्या गजरात अधीरचे अभिनंदन करण्यात आले.

श्री विश्व कन्यका आर्य वैश्य समाज बहुउद्देशीय संस्था ही गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व विवाहविषयक उपक्रमांच्या माध्यमातून समाज संघटन व प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत आहे. समाजातील नव्या पिढीला प्रोत्साहन देणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणे व सकारात्मक आदर्श निर्माण करणे, हा संस्थेचा जुना आणि गौरवशाली इतिहास राहिला आहे. अधीर जुन्नावारचा सत्कार हा त्याच परंपरेचा एक भाग असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले.

अधीरच्या या यशामागे त्याची जिद्द, नियमित सराव, पालकांचे पाठबळ तसेच योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. यापूर्वीही अधीरने दैनिक भास्करच्या वतीने नागपूर येथे आयोजित इनलाईन स्केटिंग स्पर्धेत सहभाग नोंदवून पदक मिळवले असून, तसेच प्रजासत्ताक दिनी तिरंगा हातात घेऊन गांधी चौक ते जटपुरा गेट दरम्यान अवघ्या ७ मिनिटांत स्केटिंग करत देशभक्तीपूर्ण पराक्रम साकारला होता.

मनोमिलन 2026 मेळाव्यात झालेला हा सन्मान समाजातील लहान मुलांसाठी प्रेरणादायी ठरला असून, भविष्यात अधीर आंतरराष्ट्रीय स्तरावरही देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

 

AMC24 News 📰 🗞️

मुख्य संपादक अरविंद चाहादे घुग्घूस

9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular