Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedघरफोडीच्या गुन्हयातील मुद्देमाल फिर्यादीस सुर्पूद

घरफोडीच्या गुन्हयातील मुद्देमाल फिर्यादीस सुर्पूद

घरफोडीच्या गुन्हयातील मुद्देमाल फिर्यादीस सुर्पूद

 

AMC24 News ️

मुख्य संपादक   अरविंद चाहादे

9405714165

 

चंद्रपूर – चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यांर्गत येणाऱ्या
महाकाली वॉर्ड येथील रहिवासी विनोद मधूकर अनंतवार रा. बागला चौक 14 जानेवारीला फिरायला गेले असता त्यादम्यान त्यांचे घराचे दाराचे कुलूप तोडुन घरातील आलमारीत ठेवलेले एकुण 35 ग्रॅम सोन्याचे दागीने अज्ञात चोरटयांनी चोरुन नेले अशा रिपोर्ट वरुन पो.स्टे. चंद्रपूर शहर येथे अप.क. 51/2025 कलम 331 (4) भारतीय न्याय संहिता-2023 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला व काही तासाचे आंत गुन्हयातील आरोपींचा शोध घेवुन आरोपी अटक करुन त्याचे कडुन चोरीतील एक सोन्याची चैन, एक जोड सोन्याचे कानातील लटकन, सोन्याचे डोरले मणीसह असा एकुण 1 लाख 77 हजार 390 रुपयाचा माल हस्तगत करण्यात आलेला होता. सदर गुन्हयातील मुद्देमाल पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे मुद्देमाल कक्षात जमा असल्याने संबंधीत तक्रारदार यांना मार्गदर्शन करुन त्यांना आवश्यक कागदपत्रे पुरवून न्यायालयीन प्रकियेअंती १० आक्टोंबर २०२५ रोजी विद्यमान कोर्टातुन सुपूतनामा ऑर्डर प्राप्त करण्यास लावुन मिळालेल्या कोर्ट आर्डर नुसार यातील फिर्यादी विनोद मधुकर अनंतवार रा. बागला चौक महाकाली वार्ड चंद्रपूर यांना त्यांच्या गुन्हयातील चोरीचा हस्तगत केलेला एकुण 1 लाख 77 हजार 390 रुपयांचा माल परत करण्यात आला आहे.

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular