Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedचंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थविरोधात या वर्षातील सर्वात मोठी कारवाई करीत...

चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थविरोधात या वर्षातील सर्वात मोठी कारवाई करीत तब्बल ५२८ ग्रॅम मेफेड्रोन एमडी पावडर किंमत २६ लाख ४० हजार रुपयांचा माल जप्त

 

चंद्रपूर- चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थविरोधात या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

करीत तब्बल ५२८ ग्रॅम मेफेड्रोन एमडी पावडर किंमत २६ लाख ४० हजार रुपयांचा माल जप्त   

चंद्रपुर।     विषेश प्रति निधि

AMC24 News ️

चंद्रपुर।     , विशेष म्हणजे सदर MD मुंबई वरून चंद्रपुरात पोहोचली होती. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. वसीम इमदाद खान (37) रा. बैगणवाडी रिक्षा स्टॅन्डजवळ, साईबाबा मंदिर, भोवंडी मुंबई याला अटक करण्यात आली. आरोपीवर मादक पदार्थ विरोधी कायद्यांवये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

रविवार ५ ऑक्टोबर रोजी चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन पावडर येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग वरील साखरवाही फाट्याजवळ सापळा रचला, यावेळी कार क्रमांक (एमएच 10 ईक्यू 0421) ला थांबवित पोलिसांनी वाहनांची झडती घेतली असता त्यामध्ये प्लॅस्टिक च्या प्रेसलॉक पन्नी मध्ये 528 ग्राम MD पावडर मिळून आले. यावेळी पोलिसांनी वाहन व MD सह एकूण 35 लाख 7 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

वर्षातील या मोठ्या कारवाईची पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी माहिती दिली कि चंद्रपूर जिल्हा हा नशामुक्त करण्याची मोहीम पोलीस विभागाने हाती घेतली आहे, आपल्या जवळपास कुणी अंमली पदार्थाची विक्री करीत असेल तर नागरिकांनी पोलीस विभागाला माहिती द्यावी. MD कारवाईत इमदाद खान हा आरोपी मुंबईवरून चारचाकी वाहन भाड्याने घेऊन आला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात हे पावडर कुणी बोलाविले? हा माल कुणाला विकल्या जाणार होता? याबाबत पोलीस पुढील तपास करणार असून भविष्यात अंमली पदार्थविरोधी कारवाया सतत होणार असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले.

यावर्षी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने आतापर्यंत NDPS अधिनियम अंतर्गत 157 गुन्हे दाखल करीत 192 आरोपीवर कारवाई करण्यात आली असून आरोपीकडून 80 लाख 59 हजार 774 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या 26 गुन्हे दाखल करीत 55.26 किलो गांजा जप्त करीत 40 आरोपींवर कारवाई करीत 6 लाख 62 हजार 164 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

एमडि पावडर बाळगणाऱ्या 31 आरोपींवर कारवाई करीत 14 गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपीजवळून 722.614 ग्रॅम MD पावडर सह 43 लाख 78 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ब्राऊन शुगर बाळगणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करीत 298 ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त करीत 2 आरोपींवर कारवाई करीत तब्बल 30 लाख 19 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या 186 आरोपींवर कारवाई करीत 156 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी सुनील गोहोकार, इम्रान खान, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, हिरालाल गुप्ता, शशांक बदामवार, किशोर वाकाटे, विजयमाला वाघमारे व प्रमोद डंभारे सह सायबर पोलीस स्टेशन यांनी केली.

 

मुख्य संपादक अरविंद चाहादे

9405714165

 

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular