धक्कादायक :- भद्रावती तहसील कार्यालयात विष प्राशन करणाऱ्या त्या शेतकऱ्यांनी अखेर सोडले प्राण.

AMC24 News ️
चंद्रपुर। भद्रावती
धक्कादायक
अनिल धानोरकर यांच्या नावाने बेकायदेशीर असलेला सातबारा आमच्या नावाने करा तरच शव उचलणार,मेश्राम परिवाराची आक्रमक भूमिका..
चंद्रपूर /भद्रावती :-
भद्रावती तालुक्यातील कुरोडा येथील शेतीसंबंधी प्रकरणात न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी न करता व शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन सुद्धा जमिनीचे फेरफार न केल्याने अर्जदार परमेश्वर विश्वनाथ मेश्राम (वय ५५, रा. मोरवा) यांनी यांनी 26 सप्टेंबर 2025 रोजी तहसील कार्यालयात विष प्राशन केले होते, दरम्यान मेश्राम यांना जिल्हा सामान्य
रुग्णालयात भरती करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर होती, अशातच मृत्युंशी झुंज देत अखेर 10 दिवसांनतर परमेश्वर विश्वनाथ मेश्राम यांची आज पहाटे 3:00 वाजता प्राणज्योत मालवली, या घटनेने मेश्राम परिवारावर मोठं दुःख आणि संकट कोसळलं असून मेश्राम यांच्या मृत्यूला जबाबदार तहसीलदार भंडारकार, नायब तहसीलदार खांडरे व भद्रावती नगरपरिषद चे
माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतकांच्या कुटुंबियांचे नावे तात्काळ सातबारा करा व नुकसान भरपाई द्या अन्यथा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन केलेले मृतक परमेश्वर मेश्राम चे प्रेत उचलणार नाही अशी भूमिका मृतक परिवाराने घेतल्याने जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन हतबल झाले व शव शीतगृहात ठेवण्यात आले.
मृतक अर्जदार परमेश्वर विश्वनाथ मेश्राम (वय ५५, रा. मोरवा) यांनी कुरोडा येथील सर्वे नंबर 86, 87, 95, 98 मधील शेतजमिनीवर 2015 च्या न्यायालयीन आदेशानुसार सद्यस्थितीत भद्रावती चे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या असलेली शेतजमीन ही मेश्राम परिवाराच्या वारसांच्या नावे अभिलेखात नोंदविण्याची मागणी केली होती. मात्र, अधिकाऱ्यांनी आदेशाची अंमलबजावणी न करता या प्रकरणात “
मालकी हक्काबाबत वाद आहे” असे नमूद करून अर्ज निकाली काढला. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतरही न्याय न मिळाल्याने निराश झालेल्या परमेश्वर मेश्राम यांनी 26 सप्टेंबर 2025 रोजी तहसील कार्यालयात विष प्राशन केले. दरम्यान आज पहाटे 3:00 वाजता त्यांचे दुःखद निधन झाले, त्यामुळे शेतजमिनीचा लढा अर्ध्यावरती राहिला या विवचंनेत मेश्राम परिवारावावर मोठा आघात झाला मात्र त्यांना
आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तहसीलदार राजेश भांडारकार, नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांचेसह राजकीय दबाव टाकून मेश्राम परिवाराला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या anil धानोरकार यांचेवर अदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आमच्या नावाने सातबारा फेरफार घ्या अन्यथा आम्ही शव उचलणार नाही अशी तटस्थ भूमिका मेश्राम परिवाराने घेतली, त्यामुळे मृतकावर
अंतिमसंस्कार करण्यात आले नाही, दरम्यान
जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष महेश वासलवार यांनी मृतकाच्या परिवाराला न्याय द्यावा व दोषीवर गुन्हे दाखल करून परिवाराला आर्थिक मदत द्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मृतकांच्या परिवाराला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरेल असा इशारा प्रशासनाला दिला आहे.





