घुग्घुस। मधील गुरुकृपा पेट्रोल पंपाच्या बेका यदेशीर कारभाराविरोधात नागरिक आक्रमक – जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल

AMC24 News ️
मुख्य संपादक अरविंद चाहादे
9405714165
घुग्घुस, ता. चंद्रपूर |:घुग्घुस ते चंद्रपूर फोरलाईन महामार्गालगत असलेल्या गुरुकृपा पेट्रोल पंप संचालक/मालक विनोद चंद्रकांत चौधरी यांच्या बेकायदेशीर आणि धोकादायक कारभाराविरोधात स्थानिक रहिवासी हारुण शेख यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, सदर पेट्रोल पंप रहिवासी लेआउटच्या प्रवेशद्वारावर असून, वाहनांची वर्दळ व अवजड ट्रक/टँकरमुळे नागरिकांचे रोजचे जीवन धोक्यात आले आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुरक्षात्मक वॉल कंपाऊंड नसल्याने परिसर पूर्णपणे उघडा असून, रहिवाशांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
तक्रारीमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, शासन नियमांचे उल्लंघन करून चालवला जाणारा हा पंप नागरिकांच्या सुरक्षिततेला थेट धोका ठरतो आहे. जड वाहने मुख्य रस्त्यावर उभी राहत असल्याने महिला, लहान मुले व वृद्धांची वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आहे.
शेख हारुण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढील मागण्या केल्या आहेत:




