Friday, May 1, 2026
Google search engine
Homeमुख संपादक. अरविंद चाहादेलाच मागणाऱ्यांची तक्रार करण्यास नागरिकांनी पुढे यावे - मंजुषा भोसले

लाच मागणाऱ्यांची तक्रार करण्यास नागरिकांनी पुढे यावे – मंजुषा भोसले

लाच मागणाऱ्यांची तक्रार करण्यास नागरिकांनी पुढे यावे – मंजुषा भोसले

 

विरुरच्या आठवडी बाजारात लाचलुचपतविरोधी जनजागृती

AMC24 News ️

चंद्रपूर (दि. 26 सप्टेंबर२०२५) –

भ्रष्टाचाराविरुद्ध लोकजागृती करण्यासाठी आज विरुर स्टेशन येथील आठवडी बाजार परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) चंद्रपूरतर्फे जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

कार्यक्रमात नागरिकांना संबोधित करताना पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांनी सांगितले की, “शासकीय सेवक किंवा कोणताही कर्मचारी आपल्याकडे पैशाची मागणी करत असल्यास न घाबरता तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. विभाग तुमच्या सेवेसाठी सक्षम व सदैव तत्पर आहे. अशा घटनांची माहिती आमच्यापर्यंत पोहचवा अथवा टोल फ्री तक्रार क्रमांक १०६४ वर संपर्क साधा. भ्रष्टाचाराविरुद्ध आपण सर्वांनी एकजुटीने लढा दिला पाहिजे.” या प्रसंगी पोलिस कर्मचारी आर. नेवारे व आर. इंगळे यांनीही नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला गावातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये विरुर प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष रामअवतार सोनी, भिमराव पाला, अरुण झाडे, जगतसिंग वधावन, ललितकुमार सोनी, चिरंजीव चिलका, अजय टांग, प्रवीण चिडे यांचा समावेश होता. सर्व उपस्थित मान्यवरांनी लाचलुचपतविरोधी लढ्यात सहभाग नोंदवण्याचे आवाहन नागरिकांना केले.

मुख्य संपादक अरविंद चाहादे

9405714165

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular