Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedजागतिक आदिवासी दिनानिमित्त घुग्घूस येथे, कुवारा भिवसन मंदिर पेनठाणा(मंदिर) उदघाटन, काँग्रेस शहर...

जागतिक आदिवासी दिनानिमित्त घुग्घूस येथे, कुवारा भिवसन मंदिर पेनठाणा(मंदिर) उदघाटन, काँग्रेस शहर अध्यक्ष -राजूभाऊ रेड्डी, व महेश डोंगे, (शिवसेना शिंदे गट) यांच्या सेवाकार्य बांधकाम करून दिल्याबद्दल सत्कार सन्मान करण्यात आला

जागतिक आदिवासी दिनानिमित्त घुग्घूस येथे, कुवारा भिवसन मंदिर पेनठाणा(मंदिर) उदघाटन, काँग्रेस शहर अध्यक्ष -राजूभाऊ रेड्डी, व महेश डोंगे, (शिवसेना शिंदे गट) यांच्या सेवाकार्य बांधकाम करून दिल्याबद्दल सत्कार सन्मान करण्यात आला

AMC24 News. मुख्य संपादक

अरविंद चाहादे घुग्घूस।   । 9405714165

घुग्घूस : संयुक्त राष्ट्रसंघाने आदिवासी जमातीचे अस्तिव आदिवासी समाजाच्या हक्काचे समर्थन व संरक्षण करण्यासाठी 09 ऑगस्ट 1994 रोजी या दिवसाला जागतिक आदिवासी दिन म्हणून मान्यता दिलेली आहेत.
त्या अनुषंगाने 09 ऑगस्ट हा जगभरात आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो घुग्घूस शहरात नवएकता जयसेवा बहुउद्देशीय संस्था चांडागढ व सकल आदिवासी समाज बांधवाच्या वतीने 09 ऑगस्ट 2025दुपारी 03 वाजता अमराई येथील कुंवारा भिवसेन पेनठाणा येथून भव्य शोभयात्रा काढण्यात आली यामध्ये एका रथात भगवान बिरसा मुंडा, विर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेसह सल्ला गागरा व धर्मगुरू कुपार लिंगो यांच्या प्रतीक ठेवण्यात आले.
शोभयात्रेत पारंपरीक गोंडी ढेमसा नृत्य, घुसाडी, दंडार, व विविध माध्यमातून आदिवासी समाजाने जल्लोषात आदिवासी दिन साजरा केला.
यापवित्र दिनानिमित्त अमराई येथे निर्माण करण्यात आलेल्या कुंवारा भिवसेन पेनठाणा (मंदिराचे) उदघाटन काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी तसेच शिवसेना (शिंदे गट )अध्यक्ष महेश डोंगे यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमात भूमका संतोष दादा मेश्राम, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी निलेश पडगीलवार, अरुण पेंदोर, उज्वला उईके, माजी उपसरपंच सुधाकर बांदूरकर,काँग्रेस जिल्हा महासचिव अलीम शेख, काँग्रेस नेते पवन आगदारी, प्रकाश बोबडे, काँग्रेस महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद, भाजपा महिला नेत्यां उषाताई आगदारी,शिवसेना ( उबाठा) नेते अमित बोरकर, बाळूभाऊ चिकनकर,सामाजिक कार्यकर्ते पंकज धोटे व मोठ्या संख्येने सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता संस्थेचे प्रभारी अध्यक्ष मनोज चांदेकर, कोषाध्यक्ष दिपक पेंदोर, सहसचिव देविदास कोवे,यांनी केला असून कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता, मंदेश्वर पेंदोर, अंकुश उईके, मनीष आत्राम, प्रवीण जुमनाके, अरविंद किवे, स्वप्नील गेडाम, प्रवीण उईके, संदीप तोडासे, रोशन कळपते, केशवभाऊ टेकाम, ललित आत्राम, विठ्ठल कुमरे, कवडू मडावी, राकेश सलामे, धनराज आत्राम, संजय आत्राम, दिलीप टेकाम, अरुण पेंदोर, विजय आत्राम, संदीप आत्राम, देविदास कोडापे, प्रितम येटे, गुरु गेडाम, कुणाल टेकाम, गणेश धुर्वे, महेश किन्नाके, रवी उईके, बंडू सिडाम, महेश कोडापे, ज्ञानेश्वर उईके यांनी अथक परिश्रम घेतले.

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular