घुग्घुस :-दिनांक 1ऑगस्ट )घुग्घूस -वणी मार्गावर असलेल्या वर्धा नदीच्या बेलोरा पुलावरून ट्रक खाली कोसळल्याची घटना आज शुक्रवारला सकाळी 10 वाजता दरम्यान घडली.

माहितीनुसार 18 चक्का हायवा क्रमांक
AMC24 News घुगुस. मुख्य संपादक
अरविंद चाहादे
9405714165
MH34/BZ1402 चड्डा कंपनीचा ट्रक हा वेकोलीच्या नायगाव खदानित कोळसा भरण्यासाठी जात असताना अचानक ट्रक चालकाला हृदयविकाराचा झटका आला व ट्रक अनियंत्रित होऊन पुलाची रेलिंग तोडून वर्धा नदीच्या काठावर पडला यामुळे ट्रक चालक केबिनमध्ये अडकून गंभीर जखमी झाला.ट्रक चालकाचे नावं यादव असे असून तो शास्त्रीनगर घुग्घूस येथील रहिवाशी असल्याचे सांगितले जाते. या घटनेची माहिती या मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्याना होताच नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या संख्येने गर्दी केली व तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता पोलीस व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि गॅस कटरच्या मदतीने ट्रकचे केबिन कापून ट्रक चालकाला बाहेर काढले व उपचारासाठी दवाखान्यात भरती करण्यात आले असता उपचारादरम्यान पाच तासांनी मृत्यू झाला असल्याचे कळते.या घटनेचा पुढील तपास घुग्घूस पोलीस करीत आहे.




