Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedराजीव रतन चौकातील ट्रॅफिक जामची समस्या सोडवा :- महिला काँग्रेस. पोलीस...

राजीव रतन चौकातील ट्रॅफिक जामची समस्या सोडवा :- महिला काँग्रेस. पोलीस निरीक्षकांना निवेदनातून मागणी

राजीव रतन चौकातील ट्रॅफिक जामची
समस्या सोडवा :- महिला काँग्रेस

पोलीस निरीक्षकांना निवेदनातून मागणी

          AMC24 News   

मुख्य संपादक अरविंद चाहादे

9405714165 

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौक रेल्वे गेटवर काल दिनांक 16 मे रोजी जवळपास दिड ते दोन तासाचा ट्रॅफिक जाम लागला होता हे नेहमीचेच झाले आहेत अनेकदा या जाममुळे रुग्णवाहिकेतील रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना ही घडली आहे.
या रस्त्यावर मोठया संख्येने जडवाहने जात असल्यामुळेच ट्रॅफिक जाम होत असतो या जडवाहनाचे व्यवस्थित नियोजन करावे जेणेकरून दुचाकी व चारचाकी धारक वाहन धारकांना ट्रॅफिक जामचा त्रास होऊ नये बेशिस्तपणे जाणाऱ्या जडवाहनावर दंडात्मक व प्रतिबंधात्मक कारवाई करावी ही व ट्रॅफिक व्यवस्थित करावे अशी मागणी पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांना निवेदनातून महिला काँग्रेस तर्फे देण्यात आले याप्रसंगी जिल्हा महिला काँग्रेसचे जिल्हा सचिव पदमा त्रिवेणी, जिल्हा सचिव दुर्गा पाटील, ज्येष्ठ नेत्या संध्या मंडल, मंगला बुरांडे, सुगनम्मा डोमा,दुर्गम्मा आरापेल्ली व अन्य पदाधिकारी उपस्थित होते

चंद्रपूर ते यवतमाळ मार्गांवरील राजीव रतन चौकातील रेल्वे गेटवर आर. के. मदानी कंपनीतर्फे उड्डाणपुल निर्माण करण्यात येत आहे.
मात्र याठिकाणी निर्माणाच्या नावावर केवळ थट्टाच शुरु आहे कंपनीला पूल निर्माण करण्याची दिलेली निर्धारित मुद्दत संपून वर्ष लोटला असतांना देखील उडान पूलाचा काम झाला नाही आता तर कामच बंद असल्याने नागरिकांची जीवे जात आहे. आर. के. मदानी कंपनी तर्फे रेल्वे उड्डाणपुलाचे निर्माण कार्य गेल्या तीन ते चार वर्षांपासून कासव गतीने शुरु असून याठिकाणी एकेरी रस्ता असल्यामुळे व हा रस्ता कंपनीने आपल्या निर्माण कार्यामुळे खराब केल्याने रस्त्यावर जागोजागी खड्डे व खडतर रस्ता केल्यामुळे सतत अपघात होतात हा रस्ता कंपनी तर्फे ग्रेडर मशीन द्वारे तातडीने दुरुस्त झाला पाहिजे हा रेल्वेगेट दर अर्ध्या तासात बंद होत असल्यामुळे वाहतूकाची प्रचंड कोंडी निर्माण होत असते. या मार्गांवरून जडवाहतुकीला बंदी करण्यात आली होती. मात्र गेल्या काही महिन्यापासून याठिकाणा वरून सध्या जाडवाहतूक शुरु झाल्याने याठिकाणी प्रचंड अशी वाहतूकाची कोंडी निर्माण झाली यामुळे शालेय विद्यार्थ्यांना, कर्मचाऱ्यांना व विशेषतः राजीव रतन रुग्णालयात येणारे जाणारे रुग्ण तसेच वेकोली कॉलनी व वणी क्षेत्रातील ग्रामीण भागातील रुग्णांना वाहतूक कोंडीमुळे जीवघेणा त्रास भोगावा लागतो व कधी कधी जीवाला ही मुकावा लागते कृपया या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी व
जाडवाहनाना या मार्गाने येण्या जाण्यासाठी रात्री ते पहाटेची वेळ उपलब्ध करून द्यावे व वाहतुकीची कोंडी सोडवावी तसेच आर. के. मदानी कंपनीने तातळीने पुलाचे निर्माणकार्य पूर्ण करावे तसेच रस्त्यावरील खड्डे भरून काढावे अन्यथा या कंपनी विरोधात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महिला काँग्रेसने दिला आहे.

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular