चार महिन्यात महानगर पालिकेच्या निवडणूक होणार लोकशाही टिकविण्यासाठी निवडणुका घेणे आवश्यक : सुप्रीम कोर्ट महिन्यात महानगर पालिकेच्या निवडणूक होणार लोकशाही टिकविण्यासाठी निवडणुका घेणे आवश्यक : सुप्रीम कोर्ट
AMC24 News घुगुस
मुख्य संपादक अरविंद चाहादे
9405714165
: मुंबई मि मराठी. संवाद लेखन.माहीती
महाराष्ट्रातील महानगर पालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून आज 06 मे रोजी सुप्रीम कोर्टाने मोठा आदेश देत लोकशाही टिकवायची असल्यास निवडणुका घेणे अंत्यन्त आवश्यक असून चार आठवड्यात अधिसूचना जाहीर करा व चार महिन्यात निवडणुका घ्या असा आदेश दिला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील महानगर पालिकेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत यामुळे शहरांचा विकास ही रखडलेला असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
तसेच राजकीय पक्षाचे नेते व कार्यकर्ते ही त्रस्त झाले होते.
आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, चंद्रपूर सह राज्यातील सर्वच महानगर पालिकेच्या निवडणुका होतील



