घुग्घूस अमराई येथील नागरिकांचे अतिक्रमनातील घरे हटविण्यात येऊ नये
काँग्रेसचे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना निवेदनातून मागणी 
AMC24 new
घुग्घूस : घुग्घूस येथील अमराई वॉर्डातील नागरिकांना तहसील कार्यालयातून शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी नोटीस देण्यात आलेले आहेत सदर नागरिक हे गेल्या तीस चाळीस वर्षांपासून शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहतात हे सर्व गरीब नागरिक असल्यामुळे त्यांचे अतिक्रमण न काढता त्यांना घरपट्टे देऊन नियमाकूल करावे अशी मागणी घुग्घूस शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी सैय्यद अनवर यांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना निवेदनातून केली आहे
मौजा घुग्गघूस सर्वे क्रं 264 आराजी पैकी 462 चौ. मी./ चौ. फूट जमिनीवर निवासी व वाणिज्य प्रयोजनार्थ अतिक्रमण केलेल्या नागरिकांना न्यायालयीन आदेशाचा संदर्भ देत येत्या सात दिवसात घरे खाली करण्याचे नोटीस 06 मार्च रोजी देण्यात आले आहे.
येत्या सात दिवसात नागरिकांनी स्वतःहून घर खाली न केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अंतर्गत प्रशासन अतिक्रमण काढेल व त्याचा खर्च ही नागरिकांच्या वतीने घेईल असे सुचविण्यात आले आहे.
घुग्घूस अमराई परिसरातील सदर नागरिक हे अंत्यन्त गरीब असून गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून ते येथे घरे बांधून वास्तव्य करीत आहे.
व नियमितपणे ग्रामपंचायत / नगरपरिषदेला कर देत आहे त्यांच्याकडे पर्यायी निवासी व्यवस्था नसल्याने त्यांचे अतिक्रमण काढण्यात येऊ नये ही मायबाप प्रशासनाला विनंती.
शासनाने सदर प्रकरण माणुसकीच्या दृष्टीकोनातून घेऊन सदर नागरिकांना घरपट्टे देऊन त्यांचे घरे नियमाकूल करावे
अशी मागणी काँग्रेसने केली आहेत
याप्रसंगी सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका सचिव विशाल मादर, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते
AMC24 new घुग्घूस
मुख्य संपादक अरविंद चाहादे
9405714165




