Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करा - विधीमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार

प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करा – विधीमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार


सावली नगरपंचायत अंतर्गत आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश

AMC24 new घुग्घूस

सांवली।,         ,शहरातील नागरिकांना आवश्यक त्या मूलभूत गरजा पुरविण्याकरीता सावली शहर विकासासाठी आपण जो विकास निधी खेचून आणला त्या निधीतून होऊ घातलेली प्रलंबित विकास कामे तातडीने पूर्ण करा असे निर्देश राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते, तथा विधिमंडळ पक्षनेते, ब्रह्मपुरी क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार यांनी नगरपंचायत सावली अंतर्गत पार पडलेल्या आढावा बैठकीत दिले.

आयोजित बैठकीस सावली तहसीलदार प्रांजली चिरडे, सावली नगराध्यक्ष लता लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार, मुख्याधिकारी शिवप्रसाद नागरगोजे, तथा नगरपंचायत चे सर्व विभागाचे सभापती ,नगरसेवक नगरसेविका व सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

आयोजित आढावा बैठकीत सावली शहराला होणारा पाणीपुरवठा त्यासंबंधी लावण्यात येणारी मीटर, पंतप्रधान आवास योजना 2.0 शहरी, शहरातील अंतर्गत रस्ते सांडपाणी नाल्या, अतिक्रमण तसेच सावली शहराचे सुशोभीकरण करण्याकरिता प्रस्तावित असलेला बगीचा व अन्य प्रलंबित कामे यावर विस्तृत चर्चा करून सदर प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यासंबंधी आ . विजय वडेट्टीवार यांचेकडून निर्देश देण्यात आले. तद्वतच नगरोत्थान, दलित वस्ती सुधार, योजना या योजनेअंतर्गत प्रस्तावित कामासंदर्भात तातडीने मागणी करून शहरातील नागरिकांच्या समस्या प्राधान्यक्रमांनी सोडवाव्या. असे त्यांनी यावेळी उपस्थित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितल.

AMC24 new घुग्घूस.   मुख्य संपादक अरविंद चाहादे

9405714165

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular