Monday, June 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedदोन दिवसीय नृत्य स्पर्धा व वधुवर परिचय मेळवा यशस्वीरित्या घुग्घुसमध्ये संपन्न झाला

दोन दिवसीय नृत्य स्पर्धा व वधुवर परिचय मेळवा यशस्वीरित्या घुग्घुसमध्ये संपन्न झाला

  1. दोन दिवसीय नृत्य स्पर्धा व वधुवर परिचय मेळवा यशस्वीरित्या घुग्घुसमध्ये संपन्न झाला

AMC24 new घुग्घूस

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रमाचे आयोजक नागसेन भगत व अक्षय कोवले यांनी अथक परिश्रम घेतले.
दि बुध्दीस्ट इंटरनेशनल स्कूल घुग्घुस तसेच स्मित बहुउद्देशीय युथ संस्था घुग्घुसच्या संयुक्त विद्यमाने आम्रपाली वार्ड येथे दिनांक 7 व 8 फेब्रुवारी रोजी दि बुद्धीस्ट इंटरनॅशनल स्कुलच्या प्रांगणात यशस्वीरित्या संपन्न झाला.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी नृत्य स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्याचा या स्पर्धेमागील उद्देश होता. या नृत्यस्पर्धेमध्ये एकूण 15 समूह व 17 एकल स्पर्धकानी सहभाग नोंदविला ज्यामध्ये प्रियदर्शनी कन्या विद्यालय,वियांनी विद्या मंदिर,जनता विद्यालय व अन्य शाळाबाध्य स्पर्धकांनी सुद्धा सहभाग घेतला.स्पर्धेत टाय झाल्या मुळे प्रथम पारितोषिक चंद्रपूर आणि घुग्गुसच्या डांस ग्रुप ला एकत्र देण्यात आले व एकल नृत्य प्रथम पारितोशिक चंद्रपूर च्या मुलांना देण्यात आले.

तसेच आजच्या व्यस्त जीवनशेलीच्या व स्पर्धेच्या युगात युवक व युवतींना एकाच ठिकाणी त्यांच्या आवडी-निवडीप्रमाणे जीवनसाथी निवडण्याच्या उद्देशाने वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करुन नववधु-नववराना एक मंच उपलब्ध करून देण्यात आला,या मेळाव्यामध्ये अकूण 60 नववधू – नववरांनी सहभाग नोंदविला.तसेच दोन दिवसीय कार्यक्रमाला द बुद्धीस्ट इंटरनेशनल स्कूलच्या सर्व टीचिंग स्टाफ यांनी खुप सुंदर सहकार्य केल.

यावेळी प्रामुख्याने एस.एम पाटील,गंगाधरजी गायकवाड,नागेशजी पथाडे,दिगांबरजी बुरड,कांग्रेस नेते व भाजप नेते आणि बौद्ध सर्कल समिती चे सर्व सदस्य यांची प्रमुख पाहुने म्हणुन उपस्तिथी होती.

AMC24 new घुग्घूस. मुख्य संपादक। अरविंद चाहादे

9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular