Saturday, May 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्रामपंचायत भवन ग्रामाला समृद्धी कडे नेणारे केंद्र ठरावे - आ. विजय वडेट्टीवार...

ग्रामपंचायत भवन ग्रामाला समृद्धी कडे नेणारे केंद्र ठरावे – आ. विजय वडेट्टीवार हिरापुर येथे ग्रामपंचायत भवन लोकार्पण व आर.ओ. प्लांट भूमिपूजन सोहळा संपन्न

ग्रामपंचायत भवन ग्रामाला समृद्धी कडे नेणारे केंद्र ठरावे – आ. विजय वडेट्टीवार

हिरापुर येथे ग्रामपंचायत भवन लोकार्पण व आर.ओ. प्लांट भूमिपूजन सोहळा संपन्न

AMC24 new घुग्घूस

तालुक्यातील मौजा हिरापूर येथे खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत माजी विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांचे विशेष प्रयत्नातुन आर.ओ.प्लांट ( जल शुध्दीकरण यंत्र) किंमत १७ लक्ष चे भूमिपूजन सोहळा व जिल्हा परिषद जनसुविधा अंतर्गत २० लक्ष रुपयांच्या ग्रामपंचायत भवन लोकार्पण सोहळा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांचा हस्ते पार पडले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, गावाच्या विकासाचा गाडा हाकण्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतची असते. या ग्रामपंचायत करिता निर्माण करण्यात आलेली प्रशस्त वास्तू ही जनसेवा ग्राम विकासाला दिशादर्शक ठरावी. व संपूर्ण गावाच्या झपाट्याने विकास व्हावा अशा शुभेच्छा व मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. सोबतच शुद्ध पेय जलाने नागरिकांच्या आरोग्य समस्या दूर होणार याकरिता मतदार संघातील प्रत्येक ग्राम खेळांमध्ये ग्रामपंचायतची प्रशस्त इमारत व शुद्ध पेयजल संयंत्र बसविणे हे आमचे ध्येय असून आगामी काळात जनतेला मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी सदैव प्रयत्नशील राहणार असेही ते यावेळी म्हणाले.

आयोजीत भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यास प्रामुख्याने माजी जि .प. सभापती दिनेश चिटणुरवार,सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने,माजी सभापती प.स.राकेश गड्डमवार,माजी सभापती विजय कोरेवार,माजी सभापती कृष्णा राऊत,जेष्ठ युवा नेते मुन्ना स्वामी,तेजराम बोदलकर,कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी प.स सावली योगेश गाडे,प्रमुख उपस्थिती सहाय्यक गटविकास अधिकारी प.स सावली जगनाथ तेलकापल्लीवार,विस्तार अधिकारी प.स.सावली राजु परसावार तसेच सरपंच ग्रामपंचायत हिरापूर प्रीती गोहने,ग्रामपंचायत अधिकारी सुजित येरोजवार,उपसरपंच शरद कन्नाके,सदस्य रुमाजी कोरडे,वामन भोपये,सदस्या निता मुनघाटे,माधुरी आत्राम,यशोदा देशमुख आदी मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सरपंच प्रीती गोहने,सूत्रसंचालन संदीप सायत्रावार तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी सुजित येरोजवार यांनी मानले.

AMC24 new घुग्घूस

मुख्य संपादक अरविंद चाहादे       9405714165

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular