Sunday, April 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedपरभणी आणि बीड प्रकरणी काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला.

परभणी आणि बीड प्रकरणी काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला.

  • परभणी आणि बीड प्रकरणी काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला.जे

जेआजच्या कामकाजावर काँग्रेसचा बहिष्कार.

राज्यात महायुती सरकारचे बहुमतात सरकार आले. या सरकार आल्यावर परभणी आणि बीड इथे घडलेल्या घटना या राज्याला काळीमा फासणाऱ्या आहेत. राज्यात गुंडांना संरक्षण देण्यासाठी बहुमत मिळाले का असा सवाल आज जनतेच्या मनात उपस्थित होत आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज परभणी आणि बीड प्रकरणी आंदोलन केले. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यावर या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडला.

परभणी मध्ये संविधानाची विटंबना करण्यात आली. या प्रकरणी अटक केलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात सोमनाथ सुर्यवंशी यांच्या शरीरावर जखमा असल्याचे स्पष्ट नमूद आहे. त्यामुळे पोलिसांनी कस्टडी मध्ये असताना सुर्यवंशी यांना बेदम मारहाण केली.या प्रकरणी पोलिसांवर अजूनही कारवाई करण्यात आली नाही.

बीड मध्ये देखील एक गुंड सरपंच संतोष देशमुख यांना धमकी देतो, त्यांचा जीव जाईल इतकी मारहाण होते. सरपंचाचे डोळे जाळले गेले, इतके होईपर्यंत पोलीस गुंड विरोधात कारवाई करत नाही. हा गुंड एका मंत्र्यांच्या विश्वासू आहेत, त्यामुळे त्यांना संरक्षण दिले जाते.
राज्यात सुरु असलेल्या या गुंडशाही विरोधात आज विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता,पण हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला.

स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी आम्ही केली होती, पण हा प्रस्ताव फेटाळून विरोधकांचा आवाज आज दाबला गेला.
त्यामुळे आज काँग्रेसने सभात्याग केला आणि आजच्या दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.

परभणी आणि बीड प्रकरणी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी घटनास्थळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular