Saturday, April 18, 2026
Google search engine
HomeUncategorized१६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिका असणारे चंद्रपूर हे राज्यातील पहिले मतदारसंघ ठरेल -...

१६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिका असणारे चंद्रपूर हे राज्यातील पहिले मतदारसंघ ठरेल – आ. किशोर जोरगेवार

१६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिका असणारे चंद्रपूर हे राज्यातील पहिले मतदारसंघ ठरेल – आ. किशोर जोरगेवार

शहरातील विविध बुद्ध विहार कमेटीच्या वतीने स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन..

अरविंद चाहादे मुख्य संपादक
*मो नं.9405714165

चंद्रपूर – ( amc 24 न्यूज ) : तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेली करुणा, अहिंसा, आणि समतेची शिकवण आपल्या जीवनात आणि समाजात प्रकाश पेरणारी आहे. मतदारसंघातील बुद्ध विहारांमधून आता शिक्षणाचा संदेश जावा या हेतूने आपण १६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिकांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. एकाच मतदारसंघाती १६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिका असणारे चंद्रपूर कदाचित राज्यातील पहिले मतदारसंघ ठरेल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
महाकाली कॉलरी येथील आनंद बौद्ध महिला सेवा समिती, भिवापूर येथील करुणा बुद्ध विहार आणि तक्षशिला बुद्ध विहारांच्या वतीने स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आनंद बौद्ध महिला सेवा समितीच्या वतीने आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजप महिला महानगर अध्यक्षा सविता कांबळे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, कल्याणी किशोर जोरगेवार, सायली येरणे, भाग्यश्री हांडे, नंदा पंधरे, अमोल शेंडे, ताहिर हुसेन, विमल कातकर, नीलिमा वनकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, मागील पाच वर्षांत मी सतत आपल्या संपर्कात होतो. ही गर्दी याचेच फलित आहे. सर्व समाजाचा सर्वसमावेशक विकास हेच आपले ध्येय राहिले आहे. आपण बाबुपेठ येथे भव्य विपश्यना केंद्र तयार करत असून हे केंद्र विदर्भातील उत्तम केंद्रांपैकी एक असणार आहे. मतदारसंघातील १६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिका तयार करण्याच्या दिशेने आपले प्रयत्न होते. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने यात यश आले आहे. १६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिकांसाठी आपण साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असल्याचेही यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी बुद्ध विहारांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. येथे केवळ आध्यात्मिक बळच मिळत नाही, तर सामाजिक आणि मानसिक बळही मिळते. आपल्या समाजातील नवीन पिढीने या शिकवणीचा आदर करून एक उत्तम समाज घडवावा. तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या विचारांचा प्रसार करून समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या आपल्या प्रयत्नात आमचे नेहमी योगदान राहील, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Previous article
Next article
▪️भाजप उमेदवार करण देवतळे यांची उमेदवारी रद्द करा.. ▪️आम आदमी पार्टी ची निवडणूक अधिकारी यांच्या कडे तक्रार.. मुख्य संपादक तथा संचालक श्री. तुळशीराम जांभूळकर वरोरा – ( इंडिया 24 न्यूज ) : विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार करण देवतळे यांनी त्यांच्या प्रचारासाठी लावलेल्या बॅनरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र लावून बहुजन समाजाच्या व समस्त जनतेच्या भावनांना धक्का दिला आहे. असे कृत्य करून भाजपा उमेदवार करण देवतळे यांनी महापुरुषांचा अपमान केला असून, यामुळे जनतेत संतापाची भावना निर्माण झाली आहे. आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुरज शहा आणि युवा जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुमित हस्तक यांनी यासंदर्भात निवडणूक अधिकारी, वरोरा यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात त्यांनी भाजपा उमेदवार करण देवतळे यांच्या उमेदवारीवर कारवाई करून त्वरित रद्द करण्याची मागणी केली आहे, कारण असे कृतीमुळे भारतीय संविधानाच्या आदर्शांवर आघात होतो आहे. आम आदमी पार्टीने स्पष्ट केले आहे की, महापुरुषांच्या प्रतिमांचा आदर राखणे हे सर्व नागरिकांचे व पक्षांचे कर्तव्य आहे, व अशा प्रकारची कृती संपूर्ण बहुजन समाजाच्या भावनांना निंदनीय धक्का देणारी आहे. यावेळी आम आदमी पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, जिल्हा सहसचिव सोनल पाटील, वरोरा तालुका प्रमुख गौरव मेले, भद्रावती तालुका प्रमुख सुरज खंगार, भद्रावती शहर अध्यक्ष अनिल कुमार राम, भद्रावती युवा शहर अध्यक्ष रोहन गज्जेवार, ओम पारखी, सुशांत रायपुरे व समस्त कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular