Saturday, October 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedमिडब्रेन स्पर्धेत जागतिक विक्रम करणाऱ्या विहान जिवणेचा काँग्रेस तर्फे सत्कार ...

मिडब्रेन स्पर्धेत जागतिक विक्रम करणाऱ्या विहान जिवणेचा काँग्रेस तर्फे सत्कार वाढदिवसानिमित्त केक कापून आनंदोत्सव; नगराध्यक्ष दिप्ती सोनटक्के यांच्या हस्ते गौरव

मिडब्रेन स्पर्धेत जागतिक विक्रम करणाऱ्या विहान जिवणेचा काँग्रेस तर्फे सत्कार

वाढदिवसानिमित्त केक कापून आनंदोत्सव; नगराध्यक्ष दिप्ती सोनटक्के यांच्या हस्ते गौरव

AMC24 News 📰

घुग्घूस, प्रतिनिधी : मिडब्रेन स्पर्धेत डोळ्यांवर पट्टी बांधून अवघ्या ५१ सेकंदांत ५८ वस्तू ओळखून जागतिक विक्रम करणाऱ्या घुग्घूस शहरातील विहान प्रवीण जिवणे याचा नगरपरिषदेतर्फे सन्मान करण्यात आला.

विहान याने आपल्या उल्लेखनीय कामगिरीने घुग्घूस शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. त्याच्या या यशाबद्दल नगराध्यक्ष सौ. दिप्ती सोनटक्के, सभापती नुरूल सिद्दीकी आणि नगरसेवक दिलीप पिट्टलवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.  

विशेष म्हणजे, आज विहानचा वाढदिवस असल्याने उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विहानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

अल्पावधीत ५८ वस्तू ओळखण्याची त्याची ही कामगिरी कौतुकास्पद असून, विहानच्या यशामुळे घुग्घूस शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

AMC24 News 📰 🗞️

मुख्य संपादक

अरविंद चाहादे घुग्घुस 9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular