Friday, October 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedचंद्रपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर ग्राहकांची उघड लूट; मोफत जनसुविधांऐवजी खाजगी वसुली दुकाने!*....

चंद्रपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर ग्राहकांची उघड लूट; मोफत जनसुविधांऐवजी खाजगी वसुली दुकाने!*. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पंपांचे परवाने रद्द करा; ग्राहक संरक्षण समिती आणि शिवसेनेचे ७ दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन!*

*चंद्रपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर ग्राहकांची उघड लूट; मोफत जनसुविधांऐवजी खाजगी वसुली दुकाने!*

*नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पंपांचे परवाने रद्द करा; ग्राहक संरक्षण समिती आणि शिवसेनेचे ७ दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन!*

AMC24 News 📰 🗞️

*चंद्रपूर:-* केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार तसेच तेल कंपन्यांच्या नियमांनुसार पेट्रोल पंपांवर ग्राहकांना विविध मूलभूत जनसुविधा मोफत देणे बंधनकारक असताना, चंद्रपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर ग्राहकांची सर्रास आर्थिक लूट सुरू आहे. या बेकायदेशीर कारभाराविरोधात ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती आणि शिवसेना भारतीय कामगार संघटना यांच्या वतीने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्तांना आज एक सविस्तर कायदेशीर निवेदन सादर करण्यात आले. ७ दिवसांत दोषी पंपांवर कडक कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन व प्रत्येक पंपावर तक्रार पेटी आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष व शिवसेना तालुका प्रमुख श्री. संतोष लिलाबाई दशरथ पारखी यांनी दिला आहे.

*कायद्याचा आणि नियमांचा उघडपणे भंग:*

पेट्रोल पंप चालकांना (डीलर्स) परवाना देताना आणि प्रतिलिटरमागे भरघोस ‘डीलर कमिशन’ देताना ग्राहकांना ६ मूलभूत सुविधा विनामूल्य, अखंडित आणि स्वच्छ स्थितीत देणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. यामध्ये खालील कायद्यांचा स्पष्ट आधार आहे:

१) Dealer Selection Guidelines – 2023 (परिच्छेद 1.2 g) – पेट्रोलियम मंत्रालय, भारत सरकार.

२) Marketing Discipline Guidelines (MDG) – 2023 (प्रकरण २.१, ४.२ व ८.१) – ऑईल कंपन्यांचे नियम.

३) Universal Service Obligation (USO) आदेश (दि. ०९.०६.२०२२).

४) मोटर स्पिरिट आणि हाय स्पीड डिझेल आदेश २००५ (नियम २-E व ७).

५) जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ (कलम ३) आणि वैधमापन शास्त्र कायदा २००९

६) ग्राहक संरक्षण कायदा २०१९ (कलम २-४७) – सुविधा न देणे ही ‘अनुचित व्यापार प्रथा’ (Unfair Trade Practice) आहे.

७) मा. ग्राहक तक्रार निवारण आयोग, कोझिकोड (CC/2023/XX) चा न्यायनिर्णय, ज्यानुसार सुविधा न देणाऱ्या पंपावर ₹१,६५,००० चा दंड ठोठावला गेला आहे. 

*प्रत्यक्ष पाहणीत चंद्रपूर जिल्ह्यात धक्कादायक वास्तव:*

ग्राहक संरक्षण समिती व शिवसेनेच्या वतीने वरोरा, बल्लारपूर, राजुरा, गोंडपिपरी, ब्रम्हपुरी व चंद्रपूर शहरातील ५० पेक्षा जास्त पेट्रोल पंपांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले असता खालील गंभीर बाबी समोर आल्या आहेत:

 

* ९९% पंपांवर पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नाही किंवा वॉटर फिल्टरच्या नळांना कुलूप लावलेले आहे.

 

* महिला व पुरुषांची शौचालये अत्यंत अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त आहेत किंवा त्यांना “बंद आहे” चे बोर्ड लावून कुलूप ठोकले आहे. महिला ग्राहकांना शौचालय वापरण्यास थेट नकार दिला जातो, ही मानवी हक्कांची पायमल्ली आहे.

* हवेच्या नावाखाली बेकायदेशीर वसुली: सर्वात मोठा गैरप्रकार म्हणजे कंपन्यांनी दिलेले मोफत एअर कॉम्प्रेसर मुद्दाम बंद ठेवून, पंपाच्या आवारातच खाजगी व्यक्तींना जागा भाड्याने देऊन ग्राहकांकडून हवेसाठी ₹१० ते ₹३० बेकायदेशीरपणे वसूल केले जात आहेत. हा परवाना रद्द ठरण्याजोगा गंभीर गुन्हा आहे.

* ग्राहकांनी तक्रार पुस्तक (Complaint Book) मागितल्यास त्यांना शिवीगाळ करून हाकलून दिले जाते.

*प्रशासनाला दिलेल्या प्रमुख मागण्या:*

१) ७ दिवसांत अचानक तपासणी: पुरवठा विभाग, वैधमापन शास्त्र आणि संबंधित तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती स्थापन करून जिल्ह्यातील सर्व पंपांची तात्काळ तपासणी व्हावी.

२) मराठी माहिती फलक सक्तीचा करा: प्रत्येक पंपावर “येथे सर्व जनसुविधा मोफत आहेत – तक्रार असल्यास १८००-२३३३-३५५ (IOCL), १८००-२२-४३४४ (BPCL), १८००-२२-३०३० (HPCL) वर संपर्क साधा” असा स्पष्ट मराठी फलक लावण्यात यावा.

३) दंडात्मक कारवाई व विक्री बंदी: पैसे घेऊन हवा भरणाऱ्या आणि सुविधा नाकारणाऱ्या पंपांवर MDG 2023 नुसार ₹५०,०००/- दंड आकारून पहिल्या टप्प्यात १५ दिवस विक्री व पुरवठा बंद करण्यात यावा.

४) सदर कारवाईचा अहवाल १५ दिवसांत जनहितार्थ प्रसारमाध्यमांना लेखी कळवावा.

*”पेट्रोल पंप चालकांना मिळणारे कमिशन हे ग्राहकांना सेवा देण्यासाठी असते, स्वतःचे खिसे भरण्यासाठी नाही. जर ७ दिवसांत चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने या लुटारू पंप चालकांवर धाडी टाकून कडक कारवाई केली नाही, तर शिवसेना आणि ग्राहक संरक्षण समिती लोकशाही मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करेल. तसेच प्रत्येक पेट्रोल पंपावर ‘भगवी तक्रार पेटी’ लावून आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.”*

 

*संतोष लिलाबाई दशरथ पारखी*

*(जिल्हाध्यक्ष, ग्राहक संरक्षण समिती तथा शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख तसेच जिल्हाध्यक्ष, शिवसेना भारतीय कामगार संघटना, चंद्रपूर)*

 

AMC24 News 📰

मुख्य संपादक

अरविंद चाहादे घुग्घुस 9405714165

 

 

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular