पहिल्या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा
शाळेचा गणवेश पुस्तक चॉकलेट देऊन भव्य स्वागत
जिल्हा परिषद उच्च प्राथ. शाळा घुग्घूसचे आयोजन

AMC24 News 📰 🗞️
घुग्घूस :- शहरातील शाळा 30 जून पासून सुरू झालेल्या आहेत.
विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी उत्साह निर्माण झाला पाहिजे विद्यार्थ्यांना शिक्षणात गोडी निर्माण
व्हावी ज्या हेतूने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कन्या खुबस यांच्याद्वारे एका अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या आयोजनाची शहरात सर्वत्र चर्चा आहे पहिल्या दिवशी पहिल्या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांचं भव्य असा स्वागत शहरातील नगराध्यक्ष दीप्ती ताई सोनटक्के उपाध्यक्ष राजू रेड्डी व महिला व बालकल्याण सभापती माला मेश्राम नगरसेविका सुनीता पेंदोर यांच्या हस्ते करण्यात आला

सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उप – विभागीय शिक्षणाधिकारी विशाल देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी शाळेच्या वर्गाला फुगे यांच्या द्वारे सजवण्यात आले व लाल रिबीन कापून व ढोल ताशाच्या गजरात उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी मान्यवराच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश पुस्तक व चॉकलेटचे वाटप करण्यात आले

. सदर कार्यक्रमात मुख्याध्यापक मनीषा नीलकंठ कामडे, सोनूताई कामतवार, नीताताई विस्तार अधिकारी, निर्मला चौधरी, प्रणाली ब्राम्हणे व अन्य उपस्थित होते.
AMC24 News 📰 🗞️



