आधारस्तंभ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित घुग्घुस नोंदणी कमांक ३९४ ता. जि. चंद्रपूर या संस्थेचा ठेवीदारांचे पैसे परत मिळणे व संस्थेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाली असल्याची शक्यता
घुघुस : ०३जुलै २०२६. AMC24 News
विषेश प्रति निधी।
घुगुस: अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पत संस्थेचे दिवंगत अध्यक्ष श्री. हरिश्चंद्र पुंडलीक कांबळे यांच्या काळामध्ये संस्थेच्या पैशाने वैयक्तीक स्वतःच्या नावावर अनेक मालमत्ता वेगवेगळया ठिकाणी खरेदी करण्यात आल्या. दरम्यान श्री हरिश्चंद्र कांबळे यांचे दिनांक ०८/०१/२०१९ रोजी निधन झाले.
त्यानंतर संस्थेच्या अध्यक्ष पदी श्री. कृष्णकांत गयाप्रसाद वर्मा व सचिव पदी श्री. रूपेन्द्र दिगांबर पाझारे यांची नियुक्ती करण्यात आली.
पत संस्थेचा पदभार हाती घेतल्यानंतर अध्यक्ष श्री वर्मा व सचिव श्री पाझारे यांनी दिवंगत माजी अध्यक्ष हरिश्चंद्र पुंडलीक कांबळे यांच्या नावाने असलेल्या सर्व मालमत्ता संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. कृष्णकांत गयाप्रसाद वर्मा यांनी आपल्या वैयक्तीक नावाने करून घेतल्या.ठेवीदारांच्या तक्रारी नंतर अध्यक्ष आणि सचिव यांनी स्वत: जिल्हा उप निबंधक यांना परत करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र पतसंस्थेचे अध्यक्ष कृष्णकांत वर्मा आणि सचिव रूपेंद्र पाझारे यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर यांना ठेवीदारांचे पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन सुद्धा ठेवीदारांचे अजूनपर्यंत पैसे परत मिळाले नाहीत.

आणि पतसंस्थेच्या कार्यालयाला जवळ जवळ १० – १२ महिन्यापासून टाळा लावला असून पतसंस्थेचे कार्यालय धूळ खात पडलेले असल्यामुळे ठेवीदारांमध्ये चिंतेचे सावट पसरलेले आहे.
ठेवीदार रोज धूळ खात पडलेल्या पतसंस्थेच्या कार्यालयाकडे आभारभूत नजरेने गुंतवणूक केलेले पैसे परत मिळण्याची वाट बघतात मात्र हाती येते ती निराशा.
आधारस्तंभ ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्थेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची शक्यता असल्यामुळे
ठेवीदारांचे व आर.डी. धारकांचे पैसे परत मिळण्याचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्याचा उद्रेक दिसून येत आहे.

सदरील प्रकरणाची गंभीर दखल घेवून सखोल चौकशी करून दोषी अध्यक्ष व सचिव यांच्यावर योग्य कारवाई करून ठेवीदारांचे व आर.डी. धारकांचे पैसे परत करण्यात यावेत.
तात्काळ ठेवीदारांचे आणि आर.डी. धारकांचे पैसे परत न केल्यास आणि सर्वकष चौकशी करून आधारस्तंभ गामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. घुग्घुस च्या गैरव्यवहारात दोषी आढळणाऱ्या संचालकांवर कारवाई न केल्यास मोठे जन आंदोलन उभे राहण्याची चर्चा आहे.
AMC 24 News
मुख्य संपादक अरविंद चाहादे घुग्घूस




