Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedलॉयड्स मेटल्स कंपनीच्या अवैध रस्ता बांधकामाचा विरोध! माजी उपसरपंच सुधाकर बांदुरकर...

लॉयड्स मेटल्स कंपनीच्या अवैध रस्ता बांधकामाचा विरोध! माजी उपसरपंच सुधाकर बांदुरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

लॉयड्स मेटल्स कंपनीच्या अवैध रस्ता बांधकामाचा विरोध!

माजी उपसरपंच सुधाकर बांदुरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

AMC24 News 📰 🗞️

 

घुग्घूस – चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस (शेनगाव शिव रस्ता) परिसरात लॉयड्स मेटल्स कंपनीने (Lloyds Metals) शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शिवरस्त्यावर ट्रक पार्किंग आणि ये-जा साठी राखड, इतर साहित्य टाकून बेकायदेशीरपणे काम सुरू केल्याची गंभीर तक्रार माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ता सुधाकर गणपतराव बांदुरकर यांनी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे.

या प्रकरणी बांदुरकर यांनी नायब तहसीलदार सचिन खंदारे, चंद्रपूर यांना व्हॉट्सअपद्वारे जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या नावाने जुनी प्रत (प्रतिलिपी) पाठवून सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी कंपनीच्या या कृतीमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे आणि नागरिकांचे नुकसान होत असल्याचे नमूद केले आहे.

तक्रारीचे मुख्य मुद्दे
– कंपनीने शिवरस्त्यावर आजूबाजूच्या शेतकऱ्यांची परवानगी न घेता राखड आणि इतर साहित्य टाकले.
– ट्रक पार्किंग आणि वाहतूकसाठी रस्त्यावर काम सुरू केले, ज्यामुळे रस्ता अडथळा आणि शेतीला अडचण निर्माण होत आहे.
– शेतकरी आणि नागरिकांच्या वतीने तात्काळ कायदेशीर कारवाई करून काम बंद करण्याची मागणी.

बांदुरकर यांनी नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांना नियमानुसार त्वरित हे बेकायदेशीर काम थांबविण्याचे विनंती केली आहे .
या घटनेमुळे स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, यासंदर्भात प्रशासनाकडून तातडीने दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular