Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसच बाजी मारणार… मूल येथील आढावा बैठकीत...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसच बाजी मारणार… मूल येथील आढावा बैठकीत शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसच बाजी मारणार…

मूल येथील आढावा बैठकीत शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

AMC24 News ️ 

मुल।         भाजप सत्ताकाळात अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत. तर दुसरीकडे बेरोजगारी, महागाई आणि आसमानी संकटांत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी सरकारने दगा केला आहे. सत्तेच्या मदमस्तीत राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आणि राज्याला कर्जबाजारीपणाच्या खाईत लोटणाऱ्या या वोटचोरांना होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदार राजा धडा शिकवतील, हे मी खात्रीने सांगतो. काँग्रेस पक्षाच्या तसेच सहकारी घटक पक्षांच्या पाठीशी मतदार राजा खंबीरपणे उभा राहिला असून, होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच बाजी मारेल, हेही मी जबाबदारीने सांगतो.

या बैठकीस काँग्रेसचे प्रदेश महासचिव संतोषसिंह रावत, माजी आमदार देवराव भांडेकर, भाजपमधून पक्षप्रवेश करणारे माजी सभापती प्रशांत समर्थ, सौ. एकता समर्थ, सभापती राकेश रत्नावर, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, काँग्रेस महासचिव घनश्याम येनुरकर, माजी नगराध्यक्ष विजय चिंड्यालवार, तालुका बँकेचे संचालक विलास मोगरकर, जिल्हा काँग्रेस महिला पदाधिकारी चित्राताई डांगे, माजी जि.प. सदस्य मंगला आत्राम, माजी सभापती वैशाली पुलावर, राजू पाटील मारकवार, महिला अध्यक्षा रुपाली संतोषवार, नलिनी आडपवार, पोंभुर्णा अध्यक्ष वासुदेव पाल, बल्लारपूर अध्यक्ष पिंपरे पाटील आदी मंचावर उपस्थित होते.

विखे घराण्याने अस्तित्वाची ओळख करून देणाऱ्या काँग्रेस पक्षावर टीका करताना काँग्रेस पक्षाचे उपकार विसरू नयेत. तर जमीन घोटाळ्यावरून “शेतकऱ्यांना वारंवार फुकट मागायची सवय लागली” असे बोलणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही काय झाले हे कळेनासे आहे. महायुती सरकारच्या काळात शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून, महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. अशा लुटारू महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी मतदार राजाने कंबर कसली असून, हा पक्षप्रवेश सोहळा म्हणजे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला नवी भरारी घेण्याची उमेद जागविणारा सोहळा आहे.

आयोजित सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही काँग्रेस पक्षाचे ध्येय, धोरण आणि विचार तळागाळापर्यंत पोहोचवावे, असे आवाहनात्मक मार्गदर्शन केले. यानंतर भाजपचे प्रशांत समर्थ यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सोबतच पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा, डोंगर हळदी आणि विविध गावांतील आम आदमी पक्ष तसेच इतर पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

  1. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील शेरकी यांनी केले. प्रास्ताविक गुरु गुरनुले यांनी केले, तर आभार नलिनी आडपवार यांनी मानले. आयोजित आढावा बैठकीस मूल व पोंभुर्णा तालुक्यातील शेकडोंच्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular