Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedयवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू,...

यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, सर्वत्र शोककळा.

यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांसह सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, सर्वत्र शोककळा.

AMC24 News  घुग्घूस

मुख्य संपादक अरविंद चाहादे

वणी न्यूज

तालुका प्रति निधि

अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत तब्बल 265 जणांचा मृत्यू झाल्याने देशात शोककळा पसरली असतांना पुन्हा त्या घटनेची पुनरावृत्ती होऊन वणी येथील राजकुमार जयस्वाल कुटुंबाना च्या हेलिकॉप्टरचा उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग या जिल्ह्यातील गौरीकुंड परिसरात रविवारी (१५ जून २०२५) सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. केदारनाथहून गुप्तकाशीच्या दिशेने निघालेल्या हेलिकॉप्टरचा गौरीकुंडजवळील जंगलात कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून यात महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील संपूर्ण जयसवाल कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे वणी येथे शोकळा पसरली आहें.

उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर सकाळी 5.20 वाजता गौरीकुंडच्या जंगलात कोसळले. या अपघातात एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात पायलटचाही मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. ही दुर्घटना गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण नारायण दरम्यान घडली. हेलिकॉप्टर कोसळण्याचे कारण खराब हवामान असल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टर नोडल अधिकारी राहुल चौबे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी हेलिकॉप्टर अपघाताची पुष्टी केली आहे. गौरीकुंडवर गवत कापणाऱ्या नेपाळी वंशाच्या महिलांनी हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले.

अपघाताची माहिती मिळताच SDRF व NDRF च्या च्या टीम्स तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. नेपाली महिलांनी जंगलात घास कापताना अपघाताची माहिती प्रशासनाला दिली. घटनास्थळ अतीव दुर्गम जंगलात असल्यामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे. मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आढळले असल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताची चौकशी विमान अपघात तपास ब्युरो करणार आहे. सध्या सर्व हेली सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत. या भीषण दुर्घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेषतः महाराष्ट्रातील वणी येथील संपूर्ण कुटुंबाच्या दुर्दैवी मृत्यूनं गावात शोककळा पसरली आहे. यामधील २३ महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू मन सुन्न करणारा आहे. संबंधित यंत्रणा आता अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास करत आहेत. वणी येथील राजकुमार सुरेश जायसवाल हे कोळशाचे मोठे व्यापारी असून, 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2024 दरम्यान अवघ्या विदर्भाचे लक्ष केंद्रित करणारा ऐतिहासिक ‘काशी शिवमहापुराण’ वणी येथे पंडित प्रदीप मिश्रा यांच्या संगीतमय सुश्राव्य वाणीचा कार्यक्रम जयस्वाल यांच्यातर्फे त्यांच्या पुढाकारणे आयोजित करण्यात आला होता.

या दुर्घटनेत राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा जयस्वाल, आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी काशी राजकुमार जयस्वाल यांचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, या कुटुंबाचा चिमुकला मुलगा विवान सध्या पांढरकवडा येथील आजोबांकडे थांबलेला असल्यामुळे तो या दुर्घटनेतून बचावला. मृत्यूमुखी पडलेली चिमुरडी काशी हिचे नामकरण एक वर्षांपूर्वीच करण्यात आले होते. तिच्या नावावरून वणीमध्ये काही महिन्यांपूर्वी काशी शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली होती. या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन प्रदीप मिश्रा यांच्या प्रवचनाच्या आधारे करण्यात आले होते. जयस्वाल कुटुंबाच्या अपघाती निधनामुळे वणी शहरासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नागरिक सोशल मीडियावरही शोक व्यक्त करत आहेत.

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular