Friday, May 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedशहर काँग्रेस कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या...

शहर काँग्रेस कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या तर्फे महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार

शहर काँग्रेस कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा

काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या तर्फे महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार

                 AMC24 new

घुग्घूस : जागतिक महिला दिनानिमित्त घुग्घूस शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष राजुरेड्डी यांच्यातर्फे तळगळातील
वंचित शोषित महिलांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या लढवैय्या महिला पदाधिकाऱ्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला.

O8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सर्व मातांना, भगनींना, मैत्रिणींना व या जगातल्या प्रत्येक स्त्रीला मानवंदना दिली व महिला विशेष दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
महिला दिनाच्या या छोट्याखानी कार्यक्रमात महिलांनी आपल्या मनोगतात देशात वाढत्या महिला अत्याचारावर चिंता व्यक्त केली.

सदर कार्यक्रमा प्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी आपल्या मनोगतात स्त्री म्हणजेच त्याग, प्रेम कणखरपणा आणि प्रेरणा असल्याचे सांगितले संपूर्ण मानवजातीवर स्त्रीचे असंख्य उपकार असून स्त्री हिच जगाची जननी असून तिचे उपकार शब्दात व्यक्त करता येणे शक्य नसल्याचे सांगितले सदर कार्यक्रमात महिला शहर अध्यक्ष संगीताताई बोबडे, जिल्हा महासचिव पदमाताई त्रिवेणी, शहर कार्याध्यक्ष दिप्तीताई सोनटक्के, जिल्हा सचिव दुर्गाताई पाटील, संध्याताई मंडल, माधुरीताई सुटे,सरस्वती ताई कोवे, मंगला ताई बुरांडे, पूनम ताई कांबळे, प्रीती ताई तामगाडगे, भाविका ताई आटे, लता ताई कांबळे, पुष्पा ताई गजभिये, रजिया ताई शेख, नक्षत्रा ताई तामगाडगे, सुरेखा ताई बहादुरे, प्रियंका ताई धुप्पे,व अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन काँग्रेस नेते सैय्यद अनवर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता जिल्हा महासचिव अलीम शेख,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, तालुका सचिव विशाल मादर,निखिल पुनघंटी, सुनील पाटील, अंकुश सपाटे व अन्य पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले

AMC24 new घुग्घूस

मुख्य संपादक अरविंद चाहादे

9405714165

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular