Wednesday, October 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedआदिवासी समाजाच्या धार्मिक व रावण दहन कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे पोलीस अधीक्षकांना पत्र!

आदिवासी समाजाच्या धार्मिक व रावण दहन कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे पोलीस अधीक्षकांना पत्र!

रावण दहनाबाबत योग्य कार्यवाही करा; जिल्हाधिकारी कार्यालयाचे चंद्रपूर पोलीस अधीक्षकांना पत्र

आदिवासी समाजाच्या धार्मिक व रावण दहन कार्यक्रमाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे पोलीस अधीक्षकांना पत्र!

आदिवासी समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक भावनांचा विचार करून योग्य कार्यवाही करण्याची विनंती

         AMC24 News 

घुग्घूस,: आदिवासी अनुसूचित जमाती समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक भावनांचा विचार करून रावण दहन कार्यक्रम आयोजित करू नये, अशी मागणी नवएकता जय सेवा बहुउद्देशीय संस्था, चांदागड घुग्घूस यांच्या वतीने करण्यात आली होती. या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांनी दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांना पत्र पाठविले आहे.
संस्थेच्या वतीने दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करण्यात आले होते. आदिवासी समाजातील काही समुदायांमध्ये रावण यांना पूर्वज, राजा तसेच पूजनीय व्यक्ती मानून श्रद्धेने त्यांची पूजा केली जाते. त्यामुळे रावण दहन कार्यक्रमामुळे आदिवासी समाजाच्या धार्मिक भावना व सांस्कृतिक अस्मितेचा विचार होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले होते.   

या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित प्रकरणात उचित कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीबाबत अर्जदारास अवगत करावे, असे पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांना कळविले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या पत्रामुळे रावण दहनाच्या विषयावर प्रशासनाकडून पुढील कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, रावण दहन कार्यक्रम बंद करण्याबाबत अंतिम आदेश देण्यात आला आहे, असे या पत्रावरून स्पष्ट होत नाही. संबंधित विषयावर पोलीस प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


संस्थेची मागणी
आदिवासी समाजाच्या धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक परंपरा आणि भावनांचा आदर राखण्यात यावा. रावण दहन कार्यक्रमाबाबत सादर केलेल्या निवेदनावर नियमानुसार योग्य कार्यवाही करून त्याची माहिती अर्जदारास देण्यात यावी, अशी मागणी संस्थेच्या वतीन करणे आली 

— नवएकता जय सेवा बहुउद्देशीय संस्था, चांदागड, घुग्घूस, जिल्हा चंद्रपूर. 

AMC24 News 📰

मुख्य संपादक

अरविंद चाहादे घुग्घुस  9405714165

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular