Monday, June 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedचंद्रपूरात 27 वर्षीय युवकाचा खून, सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात

चंद्रपूरात 27 वर्षीय युवकाचा खून, सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात

चंद्रपूरात 27 वर्षीय युवकाचा खून, सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात

 

विधी महाविद्यालय परिसरातील घटना
अवघ्या एक तासाचे आंत खुनाच्या गुन्हयातील सर्व आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशन रामनगरची कामगिरी

             
चंद्रपूर :-
दिनांक २३ ऑक्टोंबर, २०२५ रोजी पोलीस स्टेशन रामनगर हद्दीतील विधी महाविद्यालय समोरील परिसरात एक इसम रक्तबंबाळ व मृत अवस्थेत पडुन असुन मृत इसमाचे नांव नितेश वासुदेव ठाकरे वय २७ वर्ष रा. वार्ड क्र.१ बेताल चौक, दुर्गापूर असे असल्याचे समजले. अशी माहिती मिळताच पोनि स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर आणि पोनि पो. स्टे. रामनगर हे पोलीस स्टॉफ सह घटनास्थळी पोहचुन परिसरात विचारपुस करुन सदर गुन्हयातील आरोपीचे शोध कामी स्थागुशा आणि रामनगर पोस्टे चे वेगवेगळे पथके तयार करून शोध कार्य सुरु केला असता अवध्या एक तासाचे आंत यातील आरोपी निष्पन्न झाले असुन आरोपी क्रमांक (१) करण गोपाल मेश्राम वय २२ वर्ष रा. भिमनगर वार्ड क्र.४ दुर्गापूर (२) यश छोटेलाल राऊत वय १९ वर्ष रा. भिमनगर वार्ड क्र.४ दुर्गापूर (३) अनिल रामेश्वर बोंडे वय २२ वर्ष रा. समता नगर दुर्गापूर (४) प्रतिक माणिक मेश्राम वय २२ वर्ष रा. वार्ड क्र.४ दुर्गापूर (५) तौसिक अजीज शेख वय २३ वर्ष रा. फातेमा मस्जीद जवळ वार्ड क. ३ दुर्गापूर (६) सुजीत जयकुमार गणविर वय २५ वर्ष रा. भिमनगर वार्ड क्र.४ दुर्गापूर यांनी आपसी किरकोळ वादामधुन मृतक नितेश वासुदेव ठाकरे याचा खुन केल्याचे प्रथमदर्शनी समजले आहे. यातील आरोपी क्र. १ ते ५ यांना स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे पथकाने तर आरोपी क्र. ६ यास पोस्टे रामनगर येथील गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले आहे.
सदर प्रकरणी पोलीस स्टेशन रामनगर येथे खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.
सदरची कार्यवाही श्री. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री. ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. अमोल काचोरे आणि पोलीस निरीक्षक श्री आसिफराजा शेख पोस्टे रामनगर यांचे नेतृत्वात सपोनि श्री देवराव नरोटे, सपोनि श्री दिपक कांक्रेडवार, सपोनि श्री बलराम झाडोकार, पोउपनि श्री विनोद भुरले, पोउपनि श्री संतोष निंभोरकर, पोउपनि श्री सर्वेश बेलसरे, पोउपनि श्री सुनिल गौरकार, सफौ/स्वामीदास चालेकर, पोहवा / सुभाष गोहोकार, पोहवा /इम्रान खान, पोहवा/नितीन साळवे, पोहवा / रजनीकांत पुठठावार, पोहवा/दिपक डोंगरे, पोहवा अजय बागेसर, चापोहवा प्रमोद डंबारे, पोअं/हिरालाल गुप्ता, पोअं / शंशाक बदामवार, पोअं / शेखर माधनकर स्थागुशा चंद्रपूर आणि पोस्टे रामनगर यांनी कारवाई केली आहे.
       मुख्य संपादक अरविंद चाहादे घुग्घुस
        9405714165
RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular