Friday, June 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedराजीव रतन उड्डाणपुला करीता महिलांचा खड्यात बसून पाच तास चक्काजाम आंदोलन

राजीव रतन उड्डाणपुला करीता महिलांचा खड्यात बसून पाच तास चक्काजाम आंदोलन

राजीव रतन उड्डाणपुला करीता महिलांचा खड्यात बसून पाच तास चक्काजाम आंदोलन

 

 

AMC News ️ ️ ️

मुख्य संपादक।  अरविंद चाहादे घुग्घूस

घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौका हा शहरातील नागरिकांसाठी नरक यातना देणारा चौक झालेला आहे.अर्धवट निर्माण झालेला रेल्वेपूल वारंवार बंद होणारा रेल्वे फाटक रस्त्यावरील खड्डे यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून जाणे जीवाशी खेळणे असेच झाले असल्यामुळे तसेच रेल्वे प्रशासन वारंवार खोटे आश्वासन देत असल्यामुळे आज कॉलनी परिसरातील संतप्त महिलांनी व नागरिकांनी चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली.

सदर आंदोलनात महिलांनी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बसून चक्क पाच तास चक्काजाम आंदोलन केले.सदर आंदोलन माला मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.आंदोलनाची गंभीरता लक्षात घेऊन
पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत याने चंद्रपूर येथून दंगा नियंत्रण पथक बोलविले होते.व पोलिसांचा तगडा बंदोबस्त केला होता मात्र आंदोलनकारी जोपर्यंत महारेल वेकोलीचे अधिकारी येऊन नागरिकांना यागंभीर समस्यावर समाधान करून देत नाही तोपर्यंत आंदोलनाला माघार घेण्यासाठी नकार दिला.

नागरिकांचा आक्रोश बघता नागपूर येथून आलेल्या महारेलच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्याच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन लिखित स्वरूपात दिले.व याच महिन्यात क्रेन आणून पुलाचे वरील प्लेट जोडण्यात येऊन चार महिन्यात घुग्गुस कडून वणी जाणारा मार्ग सुरु करण्याचे वचन दिले तोपर्यंत खड्डे पडलेले रस्त्यांची दुरुस्ती करून देण्याचे व रेल्वेच्या ओव्हरलोड कोळश्यामुळे वारंवार बंद होणारा रेल्वेगेट याची ही समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन परत घेतले.

यावेळी आंदोलन कर्त्या महिला मालाबाई अरुण मेश्राम, सुरेखा भोयर, कमलाबाई दुर्गे, अनिता गौतम कोल्हे, कल्पना जंगम, पडवेकर ताई, पिंकी निमकर, अर्चना योगेश भोंगळे, प्रिया कोंडागुर्ला, निर्मला दरपेली, शशी वाघमारे, शालिनी रामटेके, रोशन जयस्वाल, धनविजय ताई, पूजा जवादे, भारतीताई, सुमन वाघमारे, निखाडे ताई तसेच महिलांना सहयोग करण्यासाठी युवक काँग्रेसचे सुरज कन्नूर, काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी,     अनवर  सय्यद।   तौफिक शेख, सिनू गुडला, एम. आय. एमचे सानू सिद्दीकी, भाजपाचे सिनू इसारप, व मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular