Friday, June 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedतब्ब्ल तीस वर्षानंतर शांती नगर येथे रस्ते व नाली बांधकामाचे भूमिपूजन संपन्न

तब्ब्ल तीस वर्षानंतर शांती नगर येथे रस्ते व नाली बांधकामाचे भूमिपूजन संपन्न

 तीस वर्षानंतर शांती नगर येथे रस्ते व नाली बांधकामाचे भूमिपूजन संपन्न।

AMC24 News ️ ️ ️ ️

मुख्य संपादक।  अरविंद चाहादे घुग्घूस

घुग्घूस :   शहरातील लॉयड्स मेटल्स कंपनीच्या निर्माणा करीता जवळपास 1995 साली शांती नगर ही वस्ती उठवून लॉयड्स मेटल्सने गावाबाहेर जागा दिली घरपट्टे बनवून देण्याचे आश्वासन कंपनीने दिले नागरिक स्थलंतरीत झाल्या नंतर कंपनीला व गावातील नगरपरिषद प्रशासनाला या वस्तीचा विसर पडला.

या वस्तीतील गोरगरीब नागरिक मरणासन्न स्तिथीत पोहचले कुणी यांच्याकडे लक्ष द्यायला तैयार नव्हता वस्तीत नाल्या नसल्याने सर्वत्र चिखल व जंगली झाडं झूडपामुळे जंगल निर्माण झाले घरात साप विंचूचा जीवघेणा धोखा घेऊन नागरिक जगायला लागले नागरिकांच्या मदतीला महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सैय्यद या धावून आल्या नागरिकांच्या अवस्था बघून त्यांना गहिवरून आले.

त्यांनी प्रशासनाला अल्टीमेटम दिले शांती नगर येथील समस्या जर सुटल्या नाहीत तर शांती नगर येथील वासियांना घेऊन 15 ऑगस्ट 2025 रोजी वर्धा नदीत सामूहिक जलसमाधी घेणार यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली व 14 ऑगस्ट रोजी लॉयड्स कंपनीने शांती नगर येथे नाली व रस्त्याचे भूमिपूजन केले.नागरिकांच्या आंदोलनाला यश आले लॉयड्स व नगरपरिषदेचे या दुर्लक्षित वस्तीकडे लक्ष गेले ठाणेदार प्रकाश राऊत यांच्या विनंती वरून यास्मिन सैय्यद यांनी जलसमाधी आंदोलनाची सांगता केली.या आंदोलनाने महिला शक्तीचे व एकीचे बळ दाखवून दिले.

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular