मनोज जरांगे यांच्याकडून विधानसभा निवडणुकी तून माघार, एकही उमेदवार उभा करणार नाही, अशी घोषना
मुंबई :(AMC 24 न्यूज )मराठा आरक्षणासाठी लढा
अरविंद चाहादे मुख्य संपादक घुगुस
9405714165
देणारे मनोज जरांगे यांनी निवडणुकीत माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून विधानसभा निवडणूक लढवण्यावर मनोज जरांगे यांच्याकडून चर्चा केली जात होती.
अर्ज मागे घेण्याचे आवाहन.
निवडणुकीत मित्र पक्षांसोबत दलित आणि मुस्लीम उमेदवार उभे करणार होतो. कारण, एका जातीच्या जोरावर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही.
उमेदवार उभा करुन तो पडला तर जातीची लाज जाईल. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेतला. माझी सगळ्या मराठा उमेदवारांना विनंती आहे की. सगळ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत. असे जरांगे म्हणाले
निवडणूक हा आपला खानदानी धंदा नाही. एका जातीच्या जोरावर निवडणूक जिंकणे शक्य नाही. एका जातीवर पुढे जाणे शक्य नाही, हे एकमताने ठरवण्यात आले.
?आता पुढे काय होणार.
सत्ताधारी आणि विरोधकांनी बदलत्या राजकीय समिकरणाचा विचार करून आपली रणनीती आखली होती. मात्र त्यांनी आता थेट निवडणुकीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले.




