Tuesday, October 20, 2026
Google search engine
HomeUncategorized‘आपल्यापैकी एक वार मुख्यमंत्री झाला पाहिजे’, वडेट्टीवार यांनी हसत...

‘आपल्यापैकी एक वार मुख्यमंत्री झाला पाहिजे’, वडेट्टीवार यांनी हसत हस्तांदोलन करत मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधला.

आपल्यापैकी एक वार मुख्यमंत्री झाला पाहिजे’, वडेट्टीवार यांनी हसत हस्तांदोलन करत मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधला.

 

AMC24 News

चंद्रपूर.        महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदावरून नेहमीच चर्चा रंगताना दिसतात. आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यातील एका संवादाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ‘आपण दोघेही वार आहोत, आपल्यापैकी एक वार मुख्यमंत्री झाला पाहिजे’, असं वडेट्टीवार म्हणताना दिसत आहेत. या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

चंद्रपुरातील कार्यक्रमात दोन्ही नेत्यांची भेट.  

 

चंद्रपूर शहरातील रयतवारी कॉलनी परिसरात तेलगू भाषिकांचा बदकम्मा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपस्थित राहून सुधीर मुनगंटीवार बाहेर पडत असताना विजय वडेट्टीवार तेथे पोहोचले. यावेळी दोन्ही नेत्यांची भेट झाली. वडेट्टीवार यांनी हसत हस्तांदोलन करत मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधला. ‘आपल्यापैकी एक वार मुख्यमंत्री झाला पाहिजे’, असं ते म्हणाले. त्यावर मुनगंटीवार यांनीही हसून प्रतिक्रिया दिली.

मुनगंटीवारांच्या नाराजीची पुन्हा चर्चा

 

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. यानंतर त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं होतं. मुनगंटीवार यांनी वेळोवेळी आपली भूमिका मांडली असली, तरी आपण पक्ष सोडणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. 

टायगर श्रॉफ प्रकरणावरून वडेट्टीवारांची टीका

दरम्यान, अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनेवरूनही वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. मुंबईत गुन्हेगारी टोळ्यांचा प्रभाव वाढत असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या व्हायरल संवादाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे

AMC24 News 📰

मुख्य संपादक

अरविंद चाहादे घुग्घुस

9405714165

 

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular