Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedAVTS Global School येथे उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा

AVTS Global School येथे उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा

AVTS Global School येथे उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा. 

 

.     AMC24 NEWS 

चौगान :   15/8/2026     चौगान येथील AVTS Global School मध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, आनंदात आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

शाळेच्या परिसराची आकर्षक तिरंगा सजावट करण्यात आली होती. हातात तिरंगा घेऊन उभे असलेले चिमुकले विद्यार्थी, आकर्षक तिरंगा रांगोळी आणि उपस्थित पालक यामुळे संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारावून गेले.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अरविंद चाहादे, संस्थेच्या सचिव विंध्या चाहादे, ज्योती बोराडे, लक्षिता घाटबांधे, सोहम बोराडे, स्नेहल राऊत, पिऊ बनकर, सानवी पत्रे, रिहान भरे, चैतन्य भिवणकर, मोहित भरणे, सक्षम तुपट, तनुश्री विधाते आणि तेजस मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

तसेच सामाजिक कार्यकर्ते कुपाकर चाहादे यांचीही यावेळी उपस्थिती होती.

 

विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशभक्तीपर वातावरण निर्माण केले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविण्याचा संदेश देण्यात आला.

“देशप्रेमाची भावना लहान वयातच रुजविणे, हेच शिक्षणाचे खरे यश आहे,” असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

शाळेतील शिक्षक, पालक, विद्यार्थी, संस्थेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे AVTS Global School चा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत उत्साहात आणि अविस्मरणीय वातावरणात पार पडला.    

RELATED ARTICLES

संपादकीय चमू

- Advertisment -spot_img

Today News

Most Popular