80 वर्षीय महिलेवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाई करा!
काँग्रेसची पोलीस निरीक्षकांना निवेदनातून मागणी!

AMC24 News 📰 🗞️
घुग्घूस :- शहरात काल दिनांक 02 ऑगस्ट रोजी एक धक्कादायक घटना घडली असून महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
काल रात्री जवळपास 10 वाजताच्या सुमारास अमराई वॉर्डात राहणाऱ्या 80 वर्षीय महिला बस स्थानकावरून अमराई कडे पायी जात असतांना एका युवकांने त्यांना आपल्या दुचाकीवर लिफ्ट देऊन स्म्शानभूमीत नेले त्यांना जबरी मारहाण करीत त्यांचे कपडे फाडले व दागिने लुटण्याचा प्रयत्न केला.

महिलेने आरडा – ओरड केल्याने परिसरातील नागरिक मदतीला धावून आले व आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
या घटनेने शहरभरात महिलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

शहरात गुन्हेगारीत प्रचंड वाढ झालेली आहे शहरामध्ये परप्रांतीय कामगारांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली असून शहरभरात अवैध धंद्यात मोठी वाढ झालेली आहे.
लॉयड्स मेटल कंपनीच्या दोन्ही बाजूला अवैध देशी दारू गांजा तसेच एमडी विकल्या जात आहे तसेच शहरभरात ही गांजा व एमडीची विक्री जोरात होत आहे अश्या तक्रारी नागरिक करीत आहे.

गेल्या आठवड्यात रविवारच्या रात्री स्टॅम्प विक्रेते यांच्यावर प्राण घातक हल्ला करून त्यांच्या जवळील रोख रक्कम हिसकावण्यात आली तो प्रकरण शांत होत नाही तर काल रात्री रविवारच्या दिवशी 80 वर्षीय जेष्ठ महिलेला मारहाण व लूटमारीची घटना घडली आहे.

या निंदनीय घटनेचा निषेध करीत आज शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणेदार साहेबांना निवेदन देऊन शहरातील अवैध धंद्यांवर आळा घालण्याची मागणी केली आहे याप्रसंगी नगराध्यक्ष दीप्ती सोनटक्के, शहर काँग्रेस अध्यक्ष तथा नप उपाध्यक्ष राजू रेड्डी, महिला जिल्हा उपाध्यक्ष यास्मिन सय्यद, आयेशा बुखारी,बुखारी काँग्रेस नेते सय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख जिल्हा सचिव अजय उपाध्ये, ज्येष्ठ नेते अनिरुद्ध आवळे,शहजाद शेख,गणेश पाणघाटे,सागर डांगे,प्रशांत सारोकर,देव भंडारी कुमार रुद्रारप, बालकिसन कुळसंगे दीपक पेंदोर, मनोज चांदेकर,निखिल पुनगंटी शहंशाह शेख,सुधाकर जुनारकर व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होतेची पोलीस निरीक्षकांना निवेदनातून मागणी!
AMC 24 News 📰 🗞️
मुख्य संपादक अरविंद चाहादे घुग्घुस
9405714165



